
आंजर्ले लाईट हाऊस आणि सावने बीच जवळ कोकणी शैलीतील रिसॉर्ट
निजसुरे यांचे केतकी आमराई रिसॉर्ट, दापोली म्हणजे कोकणातील महाबळेश्वर असे म्हटले जाते. वर्षभर असलेले थंड वातावरणामुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. याच दापोली तालुक्यातील आंजर्ले हे एक निसर्गरम्य गाव समुद्र किनारी वसलेले आहे. हे गाव येथील ऐतिहासिक ठिकाणे, प्राचीन मंदिरे, शांत समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. दापोलीपासून आंजर्ले सुमारे २०,२५ किमी अंतरावर असून मुंबई पुण्यापासून साधारणतः पाच साडेपाच तास (अंदाजे २२५ किलोमीटर) अंतरावर आहे. पुण्या-मुंबईपासून जवळ असल्याने विकेंड डेस्टिनेशन म्हणून दापोली प्रसिद्ध आहे.
निजसुरे यांचे, केतकी ग्रुप ऑफ रिसॉर्ट – गेल्या कित्त्येक वर्षांपासून आंजर्ले येथील स्थायिक निजसुरे कुटुंब या गावात पर्यटन व्यवसायातून आपली सेवा बजावत आहेत. केतकी बीच रिसॉर्ट, केतकी वाडी रिसॉर्टच्या यशस्वी वाटचालीनंतर निजसुरे परिवाराचे एक नवीन आमराई रिसॉर्ट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नव्यानेच सुरु झालेल्या केतकी आमराई रिसॉर्ट बद्दलची संपूर्ण माहिती (Mahaparyatan) महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत.
निजसुरे यांचे केतकी आमराई रिसॉर्ट – कोकणातील हे रिसॉर्ट आंजर्ले लाईट हाऊस आणि सावने समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले एक निसर्गरम्य आणि पारंपरिक कोकणी शैलीतील रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट ६ एकर परिसरात पसरलेले असून, आंबा, फणस, काजू, नारळ व सुपारीच्या बागांमध्ये वसलेले आहे. रिसॉर्टच्या पश्चिमेस आंजर्ले लाईट हाऊस, सुंदर असे सावने बीच, तर उत्तर दिशेस असलेल्या छोट्याशा नदीकिनारी (हि नदी फक्त पावसाळ्यात प्रवाहित असते) श्रीदेवी सावणेकरीणचे स्वयंभू मूर्ती असलेले छोटेसे मंदिर आहे आणि केतकी आमराई रिसॉर्टच्या पूर्वेस घनदाट जंगल असून विविध जंगली प्राणी, पक्षांचे दर्शन येथून होते.
निवास व्यवस्था. – Ac, non Ac, सिंगल अँड twin कॉटेजेस – केतकी आमराई #Resort तर्फे, पर्यटकांना रहीवासाची अगदी उत्तम सोय पुरवण्यात येते. दोन प्रकारचे कॉटेज अर्थात अत्याधुनिक निवारा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंगल बंगलो कॉटेजेस आणि ट्वीन बंगलो कॉटेजेस मध्ये निवासाची सोय करण्यात येते. ज्यावेळी एखादा मोठा ग्रुप अथवा संपूर्ण फॅमिली येथे सफरीवर येते तेव्हा ट्वीन कॉटेज हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.केतकी आमराई रिसॉर्ट – मध्ये एसी अथवा नॉन एसी कॉटेजेस हे स्मार्ट TV सह उपलब्ध आहेत. येथील प्रत्येक कॉटेज मधून हिरवीगार आमराई आणि जंगल व्ह्यू बघायला मिळतो. कॉटेजेस मध्ये वेस्टर्न स्टाईल अटॅच बाथरूम, गरम पाण्याची सोय (सकाळी आणि संध्याकाळी), वायफाय आणि पार्किंगसह इतर आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत. ट्विन कॉटेज बंगलो मध्ये मिनी फ्रिजची सुविधा हि उपलब्ध आहे. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर सीट आऊट एरिया असून तेथे टेबल खुर्च्या टाकून संध्याकाळी मस्तपैकी निसर्गाचा अनुभव घेत निवांत वेळ सुविधा करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोईसुविधा युक्त असे हे केतकी आमराई रिसॉर्ट चांगल्या प्रतीच्या निवास आणि भोजन सुवीधा देत असल्याने पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथे वास्तव्य करताना लांबवरून येणारी समुद्राच्या लाटांची गाज, गार वारा आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो.
भोजन व्यवस्था : Resto & Dinning एरिया : घरगुती कोकणी चव असलेले शाकाहारी आणि मांसाहारी जेवण म्हणजे केतकी आमराई रिसॉर्ट येथील खासियत आहे. कोकणच्या नारळ पोफळी तसेच केळी, आंबा, फणस यांच्या गर्द वनराईत निसर्गरम्य अशा प्रदूषणमुक्त हवा असलेल्या वातावरणात रेस्टॉरंट आणि डायनिंग हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हेज आणि नॉनव्हेज साठी स्वतंत्र स्वयंपाक गृहाची रचना करण्यात आली आहे. नॉनव्हेज, सी फूड, शुद्ध आणि सात्विक घरगुती शाकाहारी जेवणाचा मनमुराद आस्वाद पर्यटकांना याठिकाणी घेता येतो.
सकाळच्या नाश्त्यामध्ये स्थानिक पद्धतीचा पारंपरिक कोकणी नाष्टा, घावन, आंबोळी, पानग्या आणि गरमागरम चहा/कॉफी, कोकम सरबत, सोलकढी येथे उपलब्ध असते. झणझणीत मिसळ, पोहे, उपमा, शिरा या सारखे पदार्थ देखील पर्यटकांना उपलब्ध करून दिले जातात. येथील बिरड्याची अर्थात डाळींब्यांची / ओल्या काजूची उसळ, आणि फणसाची भाजी पर्यटक मोठ्या आवडीने खातात. स्वीट डिश मध्ये पुरण पोळी, ताज्या नारळाच्या खोबऱ्याचे सारण असलेले उकडीचे मोदक म्हणजे इथली खासियत. मोदकाचा प्रमाणबद्ध आकार आणि चव पर्यटकांना तृप्त करून जाते. उन्हाळ्यात ताज्या आंब्यांचा आमरस आणि पुरीवर येथे येणारे पर्यटक ताव मारतात.
सर्व पदार्थ हे स्थानिक पारंपरिक मसाल्यांमध्ये बनवले जात असल्यामुळे त्यांना कोकणी धाटणीची चव असते आणि हेच आपले वैशिष्ट्य केतकी आमराई रिसॉर्टने जपून ठेवलेली आहे. सी फूड मध्ये पापलेट, सुरमई, प्रॉन्स ई. माशांचा नागरिक आवडीने आस्वाद घेतात. केतकी आमराई रिसॉर्ट येथे गेल्याशिवाय या सर्व गोष्टींचा आनंद मात्र आपल्याला घेता येणार नाही हे मात्र खरं.
केतकी आमराई रिसॉर्ट येथून एक्सप्लोअर करण्यासारखी पर्यटन स्थळे : केतकी आमराई रिसॉर्ट, आंजर्ले येथे दोनतीन दिवस वास्तव्यास केल्यास, तुम्ही आसपासच्या अनेक निसर्गसुंदर, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. आंजर्ले गावाच्या डोंगरावर वसलेले कड्यावरचा गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरातून पश्चिमेस जाणाऱ्या एका पाखाडीने पुढे चालत गेल्यास गणपतीने ठेवलेल्या पावलांचे ठसे बघावयास मिळतात.
आंजर्ले येथील पांढर्या वाळूचा समुद्रकिनारा स्वच्छ, शांत आणि गर्दीपासून दूर आहे. नारळ, सुपारी आणि केवड्याच्या म्हणजेच केतकीच्या झाडांनी वेढलेला हा किनारा आहे. हर्णे बंदरावर भरणारा मासळी बाजार प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे ताजे मासे खरेदीचा आनंद पर्यटक येथे लुटू शकतातरिसॉर्ट पासून जवळच असलेले मुरुड, हर्णे समुद्र किनारी डॉल्फिन सफारी, विविध प्रकारच्या बोट राइड्स आणि समुद्रस्नानासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.सावने समुद्रकिनारा, हर्णे बंदराच्या समुद्रात स्थित असलेला सुवर्ण दुर्ग किल्ला. केळशी गावातील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर, याकूब बाबा दर्गाह, निसर्गाचा चमत्कार असलेली वाळूची टेकडी, आसुद येथील केशवराज मंदिर या सर्व ठिकाणांच्या जवळ केतकी आमराई रिसॉर्ट येत असल्यामुळे, तुम्ही सहजपणे या पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता.
स्थानिक कोकणी जेवणाचा आस्वाद घेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवून तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवा. येवा कोकण आपलाच असाशहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून दूर असलेल्या नारळी-पोफळीच्या बागांमध्ये गुरफटलेल्या निसर्गरम्य वातावरणातील हे रिसॉर्ट आहे. कोकणी संस्कृती आणि जीवनशैली जपणारे हे केतकी आमराई रिसॉर्ट म्हणजे पर्यटकांसाठी एक प्रकारे स्वर्गसुखाचा अनुभव देणारे असेच आहे. या ठिकाणाहून पायी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर सावने समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच ठरते.


