श्रींच्या हयातीत आणि त्यांच्याच संमतीने समाधी मंदिराची निर्मिती झाली

शेगाव – प्राचिन काळी श्रृंगमुनींनी हे गाव वसवले. तेव्हापासून श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत असत. पुढे शिवगावचा अपभ्रंशहोऊन हे गाव शेगाव म्हणुन पुढे प्रसिद्ध झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मतेमतांतरे असली तरीही आज ही हे गाव मात्र ओळखले जाते ते संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या लहानशा गावात गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे हा पवित्र झालेला हा परिसर करोडो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
श्री गजानन महाराजांचे समाधी मंदिर – अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे गजानन महाराजांनी आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण केले. महाराजांनी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत भाविकांना दिले होते. त्याआधी त्यांनी एका ठिकाणी निर्देश करून ” मी या जागी राहील रे ” असे सांगितले होते. आज ही त्याच पवित्रस्थळी “श्री” चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्रींच्या हयातीत आणि संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या तळघरात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे “श्री” ची संजीवन समाधी आहे.
श्रींचे समाधी मंदिर अत्यंत शुभ्रअशा संगमरवरी बांधणीतून घडविले आहे. तळघरातील भुयारात जाऊन भाविक थेट समाधीचे दर्शन घेऊ शकतात. गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि भक्तजनांना श्री मुखदर्शनाव्दारे आपल्या दैवताचे रूप पाहता येण्याची सोय संस्थान तर्फे करण्यात आली आहे. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून‘ दर्शन घेता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस असंख्य देवीदेवतांची नक्षीकाम असलेली सुंदर शिल्पे कोरण्यात आली आहेत.
श्रीराम आणि हनुमान मंदिर – गजानन महाराज संजीवन समाधी स्थानी दर्शन घेऊन झाल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन आपण ज्यावेळी भुयारातून काही पायऱ्या चढत वरती आलो की श्रीरामाचे मंदिर आहे. श्रींच्या समधिस्थळाच्या अगदी वरती सोनेरी प्रभावळीत श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मूर्ती आकर्षक व विलोभनीय असुन भाविक मनोभावे दर्शन घेतात. समोरच मारुतीची छोटीशी मूर्ती असलेली छोटीशी देवळी आहे.
ध्यान मंदिर – येथुन पुढे आपण श्रींच्या ध्यान मंदिराकडे जातो. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पलंग, पादुका भाविकांच्या दर्शनार्थ ठेवलेले आहेत. या ठिकाणी आसनावर बसून पारायण करण्यात भविक मग्न असल्याचे दिसून येते.
शेगाव संस्थानचे प्रसादलय – दर्शन घेऊन झाल्यावर आपण येतो ते प्रसादलय येथे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाविकांसाठी मोफत प्रसाद भोजनाची सोय शेगाव संस्थान द्वारे करण्यात आली आहे. पिठलं (झुणका), वरण, भात, भाजी, ताज्या गरमगरम मऊसुत पोळ्या आणि गोडाचा शिरा असा या प्रसादलायचा रोजचा मेनू असतो. उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद असतो. भरपेट प्रसाद भोजन झाल्यावर तृप्त मनाने भाविक आपापल्या गावी प्रस्थान करतात.
शेगावात आल्यावर भेट देण्यासारखी इतर ठिकाणे – शेगाव परिसरातील पाहण्यासारखी इतर अनेक ठिकाणे आहेत. श्री गजानन महाराज समाधी मंदिर, प्रगटस्थान, बंकटलाल सदन, मारुती आणि शितलामाता मंदिर, मोटे यांचे पुरातन शिवमंदिर, कृष्णजींचा मळा गजानन महाराजांचा हत्तीशाळा / अश्वशाळा, शेगाव संस्थान भक्तनिवास आणि प्रसाद व्यवस्था या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे. एकदोन दिवास येथे मुक्काम करून आपण वरील ठिकाणे आपण बघु शकतो.
भाविकांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था – येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी बस स्टँड आणि रेल्वे स्थानकापासून थेट मंदिरापर्यंत शेगाव संस्थानची स्वतःची मोफत बस सेवा आहे. याशिवाय मंदिर ते आनंद सागर आणि परत, अशी सेवा ही कार्यरत आहे.
भक्तनिवास/भोजन व्यवस्था – शेगाव हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यानं वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. येणाऱ्या भाविकांसाठी शेगाव संस्थान द्वारे गावाच्या विविध भागात भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे. अत्यंत माफक दरात निवास, भोजन, न्याहारीची उत्तम सोय येथे केली जाते. बहुतेक भाविक या सेवेचाच लाभ घेतात. याशिवाय गावात निवास करण्यासाठी असंख्य हॉटेल्स, रिसॉर्ट्स तर न्याहारी आणि भोजनाची सोय असलेली असंख्य खानावळी आहेत. येणारे भाविक पर्यटक हा पर्याय देखील निवडू शकतात.
शेगावची प्रसिद्ध कचोरी – तुम्हाला माहित आहे का की शेगावची सुप्रसिद्ध कचोरी कुठून शेगावात आली आहे. नाही ना? तर ही कचोरी पन्नास वर्षांपूर्वी शेगावात आली. राजस्थानी, मारवाडी समाजात लग्नाच्या भोजनात प्रामुख्याने कचोरीचा समावेश असतो. मात्र इतर समाजात कचोरीची तशी माहिती नव्हती, मात्र त्यावेळी शर्मा यांनी सुरु केलेली ही कचोरी जनमानसात प्रसिद्ध झाली. शेगावात असंख्य ठिकाणी शेगाव काचोरीची छोटीछोटी दुकाने आहेत. पर्यटक शेगाव कचोरीचा आस्वाद येथे घेतातच पण घरी पार्सल घेऊन जातात.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,600)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)




