Wednesday, October 7, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

आनंदी निवास, केळशी दापोली

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 7, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा समृद्ध वारसा

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि आदरातिथ्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘डेक्कन ओडिसी’च्या २०२६-२७ हंगामाला प्रारंभ झाला आहे. मा. पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई आणि मा. पर्यटन राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय खंदारे, भाप्रसे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश र. गटणे, भाप्रसे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा हंगाम सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या वारशाचा लक्झरी रेल्वे प्रवास – यंदाच्या हंगामात ‘डेक्कन ओडिसी’ला नवे स्वरूप देण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारशावर आधारित कोचची नावे आणि QR कोडच्या माध्यमातून डिजिटल वारसा कथा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना प्रवासासोबतच महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल माध्यमातून जाणून घेता येणार आहे.

रेल्वेत मिळणार लक्झरी सुविधा – ‘डेक्कन ओडिसी’मध्ये प्रवाशांना पंचतारांकित दर्जाच्या लक्झरी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये वातानुकूलित आलिशान केबिन, आरामदायी बेडरूम, संलग्न स्नानगृह, गरम व थंड पाण्याची सुविधा, वैयक्तिक सेवा आणि हाउसकीपिंग यांचा समावेश आहे. प्रवासादरम्यान पर्यटकांसाठी रेस्टॉरंट आणि बार-लाउंजची सुविधा उपलब्ध असून, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. महाराष्ट्राच्या स्थानिक खाद्यसंस्कृतीसोबत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचाही अनुभव प्रवाशांना मिळतो. रेल्वेमध्ये लाउंज आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र जागा, तसेच प्रवाशांच्या आरामासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटनस्थळांना भेट देताना प्रवाशांना आवश्यक मार्गदर्शन आणि नियोजित पर्यटन अनुभवही उपलब्ध करून दिला जातो.

‘Maharashtra Splendour’मधून महाराष्ट्र दर्शन – यंदाच्या ‘Maharashtra Splendour’ या सफरीत मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रवासात ऐतिहासिक वारसा, प्राचीन लेणी, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे, निसर्गसौंदर्य तसेच महाराष्ट्राच्या स्थानिक परंपरांचा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

लक्झरीसोबत शाश्वत पर्यटनाची बांधिलकी – ‘डेक्कन ओडिसी’चा यंदाचा हंगाम केवळ आलिशान प्रवासापुरता मर्यादित नसून शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि डेक्कन ओडिसीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती मानसी कोठारे यांच्या समन्वयातून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव एका लक्झरी रेल्वे प्रवासातून देणारी ‘डेक्कन ओडिसी’ पुन्हा एकदा देश-विदेशातील पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र अनुभवूया… ‘डेक्कन ओडिसी’सोबत! — Mahaparyatan News

Tags: Deccan OdysseyIncredibleIndiaIndia TourismIndian Railwaykokan tourismLuxuryTrainIndiaLuxuryTravelMahaparyatan.commaharashtra tourismRoyalTrainJourney
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 7, 2026
Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan

आनंदी निवास, केळशी दापोली

October 1, 2026
गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

October 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In