Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी.

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

देशी व परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न होणे गरजेचे..... पर्यटनमंत्री

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी.

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 8, 2025
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इनरव्हील क्लब जळगांव व NAB यांचा संयुक्त उपक्रम

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त अंधांच्या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धत राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली. सकाळी उद्घाटन समारंभात NAB चे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे व आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी परीक्षक म्हणून श्रीमती मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन व सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली.

स्पर्धेनंतर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व दोन क्रमांकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाने समीक्षा माकोडे, द्वितीय ज्ञानेश्वर आहेरकर, तृतीय शिवचरण वडमोडे हे विजयी झालेत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक योगिता गायकवाड व पूजा शेंडे यांना देण्यात आला.

यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ जळगाव यांच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम पारितोषिक 5000, द्वितीय 3000 रुपये, तृतीय 2000 व उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे पारितोषिके वाटप करण्यात आलीत. परीक्षकांना सुद्धा मानधन देण्यात आले. पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी ए के नारखेडे होते. सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना ए. के. नारखेडे, जळगाव सिंधी पंचायत चे अध्यक्ष सितादास जवाहरानी, राजेश जवाहरानी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, दर्शन परिवाराचे संजय बडगुजर,अनिल शिंदे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. आमदार सुरेश भोळे, विशाल भोळे यांनी ही कार्यक्रमादरम्यान उपस्थिती होती. या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, संध्या महाजन, तनुजा मोरे, रोहिणी मोरे आदि सदस्य उपस्थित होते. NAB चे सदस्य, कार्यकारी मंडळ व सचिव सि. डि. पाटील यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी पंचायत हॉलचे अध्यक्ष राजेश जवाहरानी यांनी हॉल उपलब्ध करून दिला. तसेच प्रज्ञाचक्षु बांधवांना व भगिनींना भोजन गं.भा. पद्माबाई काळे व त्यांचे बंधू नारायण खडके यांच्याकडून देण्यात आले. आदल्या रात्री चे भोजन जी आर चौधरी NAB चे सदस्य यांच्याकडून देण्यात आले.सकाळचा नाश्ता राजू साळुंखे यांनी दिला. तसेच दोन दिवस लागणारा चहा जय सर्जिकल चे जय भैय्या यांनी दिला. इनरव्हील क्लब तर्फे सर्व स्पर्धकांना केळी चिप्स वाटप केले गेले.

या सर्व यशस्वीतेसाठी नॅबचे सचिव सि डी पाटील, सभासद संजय खंबायत,सुनील चौधरी, राजेंद्र खोरखेडे, विजय गिरनारे, महेश महाजन, श्री. सरोदे,श्री मोते यांनी कार्यक्रम यशस्वी केला. सुनील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सि‌ डि पाटील यांनी केले. परीक्षक परिचय लता पाटील, श्रुती पाठक यांनी केले. संजय बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गित स्वर साधना संगित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनि स्वरा बडगुजर, सानवि तायडे, निति दोशि , प्रतिष्ठा वर्मा यांनि सादर केले. ए के नारखेडे यांनि खान्देश गित गायले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In