Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जैन टिश्यू कल्चर रोपांच्या बायो इम्युनायझेशनसाठी सामंजस्य करार

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी.

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 7, 2025
396 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२४ वा बालगंधर्व महोत्सव ८, ९ आणि १० जानेवारी २०२६ ला

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबलावादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल.
महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमा आधी वरुण नेवे यांनी गुरुवंदना सादर केली. सूत्रसंचालक जुई भागवत हिने रिंपा शिवा हिचा परिचय करून दिला. रिंपा शिवाचा तबला सोलो झाला. आपल्या प्रस्तुतीत तीन ताल प्रस्तुत केला. यामध्ये पेशकार, कायदा, रेला, तुकडा चक्रदार इत्यादी प्रस्तुती त्यांनी केली. त्यांना संवादिनीची साथ अथर्व कुलकर्णी यांची होती.

दुसऱ्या सत्रात नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन व महेश राघवन यांचे जिओ श्रेड अशी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व कर्नाटक संगीत यांची जुगलबंदी रंगली. फ्युजन देखिल सादर झाले. ‘आज जाने की जीवना करो’ जयजयवंती रागातील तराना, ठुमरी व उपज सादर केले. त्याला श्रोत्यांकडून दाद मिळाली.

सोलो वादक रिंपा शिवा, व्हायोलीन वादक नंदिनी शंकर, श्रेड वादक महेश राघवन या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कलाकारांचे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक दीपक चांदोरकर यांनी ऋण व्यक्त केले. २४ वा बालगंधर्व महोत्सव ८, ९ आणि १० जानेवारी २०२६ ला सादर होणार असल्याचे सांगितले.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स,  गोदावरी फाउंडेशन, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे होते.

Tags: agro tourismBalgandharva mahotsavChandorkar pratishthanIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In