Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महेंद्रगिरी पर्वतावर भव्य पणतीचे त्रिपुरीपौर्णिमेला होणार प्रज्वलन

विद्यार्थ्यांनी साकारली भारतीय नकाशाच्या प्रतिकृतीची मानवी साखळी

दिवेआगर - सुवर्ण गणेशासाठी प्रसिद्ध असलेले एक गाव

महेंद्रगिरी पर्वतावर भव्य पणतीचे त्रिपुरीपौर्णिमेला होणार प्रज्वलन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 14, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिपप्रज्वलनासाठी धोतराच्या पानाची वात आणि १५ लिटर गोडेतेलाचा केला जातो वापर

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

चिपळूण | प्रति पंढरपूर व दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र परशुराम येथे डोंगरमाथ्यावर , सवतसड्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती प्रज्वलनाचा कार्यक्रम त्रिपुरारी पौर्णिमा, शुक्रवार दि .१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून नेऊन करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र परशुराम येथील ही पुरातन दीपमाळ ही शिवकालीन आहे. महेंद्रगिरी पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर ही दीपमाळ आहे. या शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्रि पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा अश्या परिसराचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट आहे. ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते. अनेक भाविक, ग्रामस्थ व तरुण या दीपप्रज्वलन कार्यक्रमाला उपस्थित असतात.

ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली आहें. त्यावरील पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली असून दिपप्रज्वलनासाठी त्यामधे १ डबा ( १५ लिटर ) गोडेतेल व एक धोतर वातीसाठी वापरले जाते.त्रिपुरारी पौर्णिमेला सायंकाळी ६.३० वाजता या भव्य पणतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येते. याच दिवशी सायंकाळी परंपरेने भगवान श्री परशुराम मंदिरात तुळशी विवाह सोहोळा संपन्न होतो.

पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे श्री क्षेत्र परशुराम येथील भव्य पणतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गत २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानं ट्रस्ट, चिपळूण तर्फे ही परंपरा पुनश्च सुरू करण्यात आली आहे.

पुर्वी या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम यांच्या मूर्तीच्या अंगावर पडत असे.असे जाणकार मंडळी सांगतात .चिपळूण शहर परिसरातून या पणती चा प्रकाश त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र दिसतो .भक्तगण नागरिक हा दीप पाहून कोकणभूमी निर्माते भगवान श्री परशुराम यांना नमस्कार करतात.

या पणतीच्या प्रज्वलनासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ व चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण कार्यकर्ते परिश्रम घेत असतात . या उपक्रमात सहभागी होण्यासाठी परशुरामभक्त व सदर प्रथा पुनश्च सुरू करणारे मुख्य शिलेदार श्री. नितीनजी लोकरे – 8149444044, श्री.अभय शिंदे – 7218869037, श्री समीर शेट्ये – 9890159247 यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच भक्तगण नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती…. संस्थान श्री भार्गवरम परशुराम.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In