मत्स्यव्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी प्रश्न
मुंबई l मत्स्य व्यवसायासाठी राज्यामध्ये ज्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तातडीने, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. यासाठी केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सदस्य भाई गिरकर, प्रसाद लाड यांनी मत्स्यव्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनुसार मासेमारी करता न आल्याने सन २०२१-२२ या वर्षाची तलाव ठेका रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यात १३७३ मच्छीमार सहकारी संस्था तसेच ४२० खाजगी ठेकेदार आहेत. राज्यातील मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव तसेच जलाशयांची सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कमेचा भरणा करण्यास दिनांक ३१ जुलै २०२२ पासून पुढे २०२१ – २२ ची तलाव ठेका माफी प्रस्ताव मंत्री मंडळासमोर सादर होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देशही विभागाला दिले आहेत, असेही मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
भविष्याचा वेध घेता परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कृषी क्षेत्राप्रमाणे या क्षेत्राला सुविधा देण्यासाठी साकल्याने विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,598)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)
