Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सवतसडा l कोकणातला प्रसिध्द धबधबा l VIDEO

AC बसने ज्येष्ठांना मुंबईतील प्रसिध्द गणपतींचे दर्शन घडवण्यासाठी विशेष सहल

मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी

सवतसडा l कोकणातला प्रसिध्द धबधबा l VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
422 13
0
598
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सवतसडा l मान्सून सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते पावसाळी पर्यटनाचे. त्यातल्यात्यात सह्याद्री पर्वत रांगांवरिल धबधब्यांचं वेड जरा जास्तच आहे.

मुंबई-गोवा हायवे – चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनित बॉम्बे टू गोवा (Bombay to Goa) आणि सचिन पिळगावकर निर्मित नवरा माझा नवसाचा या सुपरहीट चित्रपटांचे बरेचसे चित्रीकरण याच रस्त्यावर झाले असल्याने हा महामार्ग खुप प्रसिद्ध आहे.

या घाटामध्येच कोकणभूमीचे निर्माणकर्ता भगवान श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे नॅशनल हायवे १७च्या (NH 17) उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो. हाच तो ‘सवतसडा’

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

सवतसडा – या धबधब्याला सवतसडा हे नावं कसं पडले असा प्रश्न मनामध्ये नक्कीच निर्माण होतो. या सवतसड्याची कथा सांगितली जाते ती अशी की,

  • १) फार पूर्वी दोन सवती भांडतांना या कड्यावरून खाली पडल्या तेव्हापासून धबधबा सवतसडा म्हणुन ओळखला जातो
  • २) स्थानिक सांगतात ती विस्तृत कथा अशी – इथे एका गृहस्थाच्या दोन बायका होत्या. त्यातील एक स्त्री दुसरीची वेणी घालून द्यायची इच्छा व्यक्त केली. त्या स्त्रीला शंका आली म्हणून प्रत्यक्ष वेणी घालत असताना स्वतःच्या पदराची गाठ दुसरीच्या पदराला गुपचूप गाठ बांधली. वेणीफणी झाल्यावर डोंगरकड्यावरून आवडतीला ढकलून दिले. मात्र एकमेकिंच्या गाठ बांधलेली असल्यामुळे त्या दोघीही खाली कोसळून मरण पावल्या तेव्हापासन या निसर्गरम्य धबधब्याला ‘सवतसडा’ हे नाव पडलं असावं.

धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आले आहेत. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.

पाऊस खूपच पडत असेल तर पाण्याचे तुषार अगदी दूरपर्यंत पसरून धुके असल्याचा भास निर्माण होतो. अंदाजे चाळीस पन्नास फूट उंचीवरून पाणी कोसळते तेथे मुखावर या धबधब्याचा आकार अर्धगोलाकार असल्याने वेगवान जलधारा कड्यावरून खाली उथळ अशा कुंडात (पाण्याला जास्ती खोली नसलेले) कोसळतात. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच प्रवाहित असतो.

पावसाळ्याच्या दिवसात सवत सडा धबधबा परिसरात भाजलेले, बटर चिझने माखलेले मक्याचे कणीस खण्याची मजा काही औरच आहे.

परिसरातील निवास/भोजन व्यवस्था – घाटाच्या अगदी मध्यभागी असलेल्या परशुराम या गावी अगदी स्टार लेव्हलची निवास भोजन व्यवस्था येथे होऊ शकते. परशुराम गाव अगदी लहान असुन येथे होम स्टे, वाडी, कॉटेजेस, रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. धबधब्यापासुन चिपळूण शहर अगदी ५ किमी अंतरावर असल्याने तिथे हॉटेल्सचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

माफक दरात निवास/भोजन व्यवस्था – परशुराम मंदिर भक्तनिवास – तुम्ही धार्मिक पर्यटनासाठी कोकणाची सफर आखली असल्यास याच गावातील परशुराम मंदिरच्या भक्तनिवासाचा सात्विक पर्याय तुम्ही निवडू शकतात. AC/Non AC रूम आणि मोठया गृपसाठी सामूहिक निवासाची सोय येथे होऊ शकते. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हे भक्तनिवास असुन रूम्स अतिशय स्वच्छ आहेत. येथील कर्मचारीवर्ग आगत्याशिल आहे. येथे पुर्व कल्पना दिल्यास घरगुती भोजन/न्याहारीच सोय होऊ शकते. आधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : श्री जयदीप जोशी : +91 90289 80125

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismplaces to visit near Ratnagiriplaces to visit niear chiplunRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In