आद्य शक्तिपीठ असलेली अलिबागची पद्माक्षी देवी आहे त्रिपुरसुंदरीचे रूप
अलिबाग येथील पद्माक्षी रेणुका किंवा पद्मांबिका हे एक त्रिपुरसुंदरी . देवीचे रूप आहे. भारतातील ५२ शक्तिपीठांपैकी एक आद्य शक्तिपीठ असल्याचे मानले जाते. परंतु महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात याचा समावेश होत नाही. ही देवी सिंहावर आरूढ आहे. शिवाय तिला जोगेश्वरी नावाची एक बहीणदेखील आहे. देवी पद्माक्षी भगवतीला माउली, काली, – भैरवी, वज्रेश्वरी, अंबा आणि एकवीरा म्हणूनही ओळखले जाते. विशेष कोकण परिसरातील विविध जाती-धर्मांचे लोक हिला दैवत मानतात.चfया विषयीही अशी आख्यायिका आहे की, एकदा प्रजापती दक्षाने एक यज्ञ केला. यज्ञासाठी दक्षाने शिव आणि सती वगळता सर्वांना आमंत्रित केले. माहेरी जायला निमंत्रणाची गरज नसते, असे म्हणत सती सोहळ्याला गेली. तिथे राजा दक्षाने सतीचे पती शिवाचा अपमान केला, संतापून सतीने आत्मदहन केले. संतप्त झालेल्या शिवाने नंतर दक्षाचा यज्ञ नष्ट केला. क्रोध आणि शोकग्रस्त शिवाने सतीच्या शरीराचे अवशेष उचलले आणि संपूर्ण सृष्टीमध्ये तांडव केले. भगवान विष्णूने शिवाला थांबवण्यासाठी सतीच्या प्रेतावर सुदर्शन चक्र वापरले. यामुळे सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडून शक्तिपीठ तयार झाले. तिच्या शरीराचे दोन्ही कान अलिबाग येथे पडले. त्या भागातून एक देवी प्रकट झाली आणि तिचे नाव शांबवी होते. अलिबाग तालुक्यात कावाडे (आधीचे वीरुमाला) येथे एका तलावाकाठी आहे. देवीचे मंदिर अजूनही बांधलेलं नाही, पण ती निसर्गरम्य ठिकाणी तिचे पारंपरिक पद्धतीने कौलारू मंदिर आहे. असे समजले जाते की, भगवान मुकुंदभैरव म्हणजेच कनकेश्वर, जे देवीच्या मागे असणाऱ्या डोंगरात वसलेलं स्थान आहे. तिथून गंगा उत्पन्न झाली. त्यामुळे देवीच्या दर्शनाला जाताना भाविकांचे पाय धुतले जातात.• कसे जाल : अलिबागला मुंबईहून रेल्वेने जाणे हे सोपे आहे.
