महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ सप्तश्रृंगी देवीचे मंदिर
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ असलेल सप्तश्रृंगी देवीचं मंदिर हे नाशिकपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या नांदुरी गावाजवळ अजंठा सातमाळ रांगेतल्या एका डोंगरावर स्थित आहे. त्याला ‘रडकुंडी’ घाट असं नाव आहे.
सप्तश्रृंगीच्या पूर्वेला सुंदर आकाराचा जो डोंगर आहे तो मार्कडा डोंगर आणि किल्ला म्हणून प्रसिद्ध असून यावर मार्कडेय ऋषींनी, देवीन उन्मत्त महिषासुराचा वध करावा यासाठी तपश्चर्या केली होती असा समज आहे. माकडाच्या शिखरावर बसून मार्कडेय ऋषी देवीला पुराण सांगत आणि स्तोत्र ऐकवीत असत. ते ऐकण्यात मग्न झालेल्या देवीची मान किंचित झुकलेली आहे. त्याच आविर्भावात देवीची भव्य मूर्ती सप्तश्रृंग गडाच्या अर्ध्या उंचीवर कड्याला खेटून उभी आहे.
देवीच्या या गडाला एकंदर सात शिखरं असून देवीला प्रदक्षिणा घालायची असल्यास देवळाच्या उंचीवरून पहाडाला तब्बलसाडेचार कि.मी. चा फेरा चालावा लागतो पण ही वाट अतिशय रम्य आहे. या सात शिखरांवर इंद्राणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी,शिवा, धामुडा आणि नरसिंहा अशा सात देवता वास करून असतात अशी श्रद्धा आहे. हनुमंत द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे जात.असताना व्याचे जे सात तुकडे खाली पडले तीच ही शिखर असल्याचा समज आहे.
कड्याला टेकून असलेल्या देवीच्या मूर्ती समोर आता अतिशय सुरेख असं मंदिर बांधण्यात आलेल आहे. प्रत्यक्ष मंदिरापाशी चढून येण्यासाठी ४५० पायल्या आहेत. दहा फूट उंचींच्या देवीच्या मूर्तीला अठरा हात असून त्या हातांमध्ये देवीन विविध प्रकारची अस्त्र, आयुध धारण केलेली आहेत. देवीच्या पायाशी महिषासुर राक्षसाची मूर्ती आडवी पडलेली असून त्या राक्षसाथ पायांनी मर्दन करीत असल्याच्या अविर्भावात ही मूर्ती भन्न असल्याच भासतमहाच्या या पठारावर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले विशाल शिवालयतीर्थ आणि शेजारचं शिवमंदिर तसंच जवळच असलेला १५०० फूट खोलीचा तुटलेला सतीचा कठा ही प्रेक्षणीय स्थळ आहेत. समोरच्या मार्कंडा किल्ल्यावर दरीतून जाणारी वाट थरकाप
