Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोकणात आल्यावर भेट द्यायलाच हवी असे निसर्गरम्य क्षेत्र – Video

तुम्हाला माहिती आहे ? देशातला पहिला मॉल कुठे उभारला गेला ?

पुरातन कोटेश्वर मंदिर - Video

कोकणात आल्यावर भेट द्यायलाच हवी असे निसर्गरम्य क्षेत्र – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
426 5
0
592
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चिपळूण पासून जवळच असलेल्या महेंद्रगिरी पर्वत म्हणजे एकदातरी भेट द्यावी असे ठिकाण

या पर्वतावर वसलेले श्री क्षेत्र परशुराम आणि परिसरात असलेली अनेक देवीदेवतांची वैशिष्टयपूर्ण मंदिर असल्याने या क्षेत्रास देवभूमी म्हंटल्यास वावग ठरणार नाही. आज आम्ही याचं ठिकाणी असलेली मंदिरे, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे यांची माहिती व्हावी या उद्देशाने महापर्यटन निर्मित व्हीडिओ, खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

श्री क्षेत्र परशुराम – भगवान श्री परशुराम यांनी आपल्या वास्तव्याने पावन केलेले पवित्र स्थान. या स्थानाला विशेष महत्व आहे. महेंद्र पर्वतावर वसलेले हे तीर्थक्षेत्र शेकडो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. येथे आल्यावर काय बघाल ??

१. भगवान श्री परशुराम यांचे स्वयंभू मंदिर -(स्वयंभू स्थान सापडले अंदाजे ७५० वर्षांपूर्वी) (मंदिराचा पहिला जीर्णोद्धार सन १७१० – गुरू ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केला).

कोंकणातील महेंद्र पर्वतावर वसलेले परशुराम क्षेत्र
परशुराम क्षेत्राविषयी अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

२. देवी रेणुकामाता मंदिर – (हेमाडपंथी मंदिर ) मंदिरावर काळ्या पाषाणात कोरलेले शिलालेख, गंडबेरुंद, शरभ,दशावतार इत्यादी शिल्प.

३. श्री सिद्धिविनायक मंदिर – मंदिरावर काळ्या पाषाणात कोरलेली शिल्प व नक्षीकाम. छत्रपती शाहू महाराज, सातारा यांचे हस्ते स्थापना.

४. गंगादेवी मंदिर – महेंद्र पर्वतावरील पाणी साठा कधीही लोप पावू नये म्हणून गंगादेवीची स्थापना करण्यात आली.

५. श्री हनुमान मंदिर – गुरू रामदास स्वामी यांनी भारत वर्षात स्थापन केलेल्या ११०० दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरांपैकी एक मंदिर.

६. बाणगंगा तलाव – भगवान श्री परशुराम यांनी बाण मारून निर्माण केलेला तलाव.

७. गुरू दत्तात्रेय मंदिर – भगवान श्री परशुराम व गुरू दत्तात्रेय यांची भेट झाली ते ठिकाण. (दत्त भार्गव संवाद).

८. पर्वतेश्वर मंदिर (ईश्वर पार्वती मंदिर) – या मंदिराची आख्यायिका अशी की हे स्थान भगवान श्री परशुराम यांनी निर्माण केले आहे व ते येथे दैनंदिन दर्शनाला येत असत. हे स्थान निसर्गाच्या सानिध्यात असून येथे मंदिर बांधलेले नाही. येथील आख्यायिका अशी आहे की एका दिवसात या स्थानावर शेड किंवा छत बांधले गेले तरच ते टिकेल. या आधी अनेक वेळा शेड बांधण्याचा प्रयत्न झाला पण 2 दिवसात सदर शेड/छत उडून गेले/ मोडले.

९. पांडवकालीन विहीर – पांडवांनी एका रात्रीत बांधलेली ही सात टप्प्याची विहीर पेढे परशुराम गावचे ग्रामदैवत श्री देव धावजी मंदिराजवळ आहे.

१०. जांभा दगडात कोरलेल्या गुहा – श्री क्षेत्र परशुराम हे तीर्थ क्षेत्र असल्याने येथे शेकडो साधू संत तपश्चर्या/ साधना करायला येत असत. आणि या गुहांमध्ये राहून तापाचरण करीत असत. गुरू दत्तात्रेय मंदिराजवळ जांभा दगडात कोरलेल्या आशा ३ गुहा आहेत.याच बरोबर गावदेवी जाखमाता मंदिर, स्वयंभू श्री शंकराचे मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, गुरू ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी ३०० वर्षांपूर्वी बांधलेला पाण्याचा पाट(सवतसडा ते परशुराम मंदिर), मंदिराच्या बरोबर समोर १ किलोमीटर लांब डोंगरावर असलेली दीपमाळ (ज्यावर प्रज्वलित केलेल्या दिव्याचा प्रकाश भगवान श्री परशुराम यांचे चरणावर पडायचा अशी आख्यायिका प्रचलित आहे), पेढे गावातील कामधेनू मंदिर (ज्या गायीमुळे परशुरामांचे हे स्वयंभू स्थान ग्रामस्थांना सापडले त्या गायीचे मंदिर) अशा अनेक गोष्टी आपण बघू शकता.

अशा या शांत, निसर्गरम्य, आध्यात्माने भरलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पावन ठिकाणी आपण सर्वांनी अवश्य भेट द्या.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismchiplunIndia Tourismkokan tourismkonkanLoard ParshuramMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismलोटे परशुराम
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In