Saturday, July 25, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसमवेत संस्मरणीय भेट

गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 16, 2024
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी योग्य मार्गदर्शन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल व मृद संधारण, अत्याधुनिक ठिबक सिंचन, फर्टिगेशन पद्धती, जैन ऑटोमेशन, रोपांची निर्मिती व लागवड प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग म्हणजेच भविष्यातील शेतील, स्मार्ट अॅग्रीकल्चर याबाबत समजेल.

शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने यावे, तंत्रज्ञान बघावे ते आत्मसात करावे आणि प्रसारीत करावे जेणे करून उत्पादकता वाढविता येईल. आधुनिक शेतीचा अवलंब करुन सकारात्मक बदल घडविता येतो असे हॉर्टिकल्चर फलोद्यान माजी आयुक्त तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)चे माजी डी.जी.जी डॉ.एच.पी.सिंह यांनी केले.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. बिमला सिंग, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बि. के. यादव, कृषी संशोधन विभागाचे संजय सोन्नजे उपस्थित होते. हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफल, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापर यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी फक्त मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष सल्ला त्यासाठी तज्ज्ञांची सुयोग्य मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. येथील तंत्रज्ञान पहावे, अनुभवावे, आपल्याजवळील काही संशोधणात्मक अनुभव असतील ते एकमेकांना सांगावे व गावांगावामध्ये जावून त्याचा प्रसार करावे असे आवाहनही डॉ. एच. पि. सिंग यांनी केले.

या कृषिमहोत्ससाठी मसाले पिकांचे प्रात्यक्षिक आहे. त्यात हिंग, लवंग, जायफळ, तेजपान, कापूर, कढीपत्ता, दालचिनी, मिरी, आले, हळद, लसुण, कांदा, मिरची, जिरे, धने यांचा समावेश आहे. यामध्ये १९ प्रकाराचे हळद, सात प्रकारचे लसूण आपल्याला पाहता येतील. कमी जागेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यासाठी हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी चैतन्यदायी ठरेल.

Tags: agro tourismIndia TourismKrushi paryatanMahaparyatan.commaharashtra tourismकृषी अवजारकृषी विभाग
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In