Thursday, October 8, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
Dapoli

मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेला आंजर्ले लाईट हाऊस, आणि फारशी गर्दी नसलेला सावने समुद्रकिनारा

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार – आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

‘जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत कातळशिल्पांचा समावेशासाठी रोडमॅप तयार करा – सांस्कृतिक कार्य मंत्री

“कोकणातील शक्तिस्थळ” आंजर्लेची सावणेकरीण देवी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 1, 2026
402 5
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एका कोळ्याला समुद्रात सापडलेली देवीची मूर्ती

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

दापोली | आंजर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातील, थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली तालुक्यात वसलेले, एक निसर्गरम्य, आणि ऐतिहासिक गाव आहे. हे गाव जोग नदीच्या मुखाशी वसलेले असून, कोकणातील निसर्ग सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

आंजर्ले गावात अनेक पुरातन मंदिरे आहेत, जी कोकणातील पारंपरिक स्थापत्यशैली आणि इतिहास या सार्यांचा संगम आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या गावात कड्यावरचा गणपती मंदिर, पेशवेकालीन दुर्गादेवीचे मंदिर. श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आणि ग्रामदेवता श्रीदेवी सावणेकरीण. हि देवस्थाने प्रसिद्ध आहेत. याच बरोबर येथे असलेला ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा संवर्धन प्रकल्प यांसारख्या विविध आकर्षणांनी हे गाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

पर्यटकांसाठी थोडेसे अपरिचित असलेल्या, सावणेकरीण देवी मंदिराची माहिती, आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी, देत आहोत.सावणेकरीण देवी हि आंजर्ले गावाची ग्रामदेवता असल्याचे मानले जाते. गावाच्या उत्तरेकडे, लाईट हाऊसकडे जाणार्या रस्त्यावर, लाईट हाऊसच्या आधी येणाऱ्या एका वळणावरून उजवीकडे वळून पुढे अंदाजे अर्धा किलोमीटर अनंतरवर सावने परिसरात हे देवस्थान आहे.

मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेला आंजर्ले लाईट हाऊस, आणि फारशी गर्दी नसलेला सावने समुद्रकिनारा, अशा नयनरम्य ठिकाणी, श्रीदेवी सावणेकरीण देवीचे मंदिर वसलेले आहे. आंबा, काजूंच्या बागांच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराला, कळस नसून, कोकणी शैलीतील कौलारू छत आहे. फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणाऱ्या एका छोट्याशा नदीकाठावर असलेल्या या ठिकाणी श्रीदेवी सवणेकरीणचे हे मंदिर स्थित आहे.

नदीकाठावर असलेला एक छोटासा साकव ओलांडला कि समोरच मंदिराकडे जाणारी बांधीव पायवाट धारावी लागते. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे तुळशी वृंदावन, आणि एक छोटीशी विहीर दिसते. पुढे पत्रे घातलेल्या सभागृहात प्रवेश केल्यावर डाउजवीकडे चूल मांडण्यात आल्याचे दिसते. उत्सवादरम्यान प्रसाद बनवण्यासाठीची हि जागा आहे. सभागृहात पुढे एका छोट्याश्या प्रवेशद्वारातून मुख्य मंदिरात आपण प्रवेश करतो. समोरच असलेल्या तिन्ही बाजूस प्रवेशद्वार असलेल्या गर्भागृह असून त्यात श्रीदेवी सवणेकरीण देवी वसलेली आहे. उत्तराभिमुख असलेली हि देवी, गावावर येणाऱ्या संकटांचे निवारण करते, अशी स्थानिक भाविकांची श्रद्धा आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 7, 2026
Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan

आनंदी निवास, केळशी दापोली

October 1, 2026
गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

October 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In