Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

४९२ वन्यप्राणी-पक्षी,बिबट्यासह दुर्मीळ प्रजातींचे दर्शन…. २७ पेक्षा अधिक वन्यजीवांच्या प्रजातींची नोंद…

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव दि. 13 मे ( जिमाका वृत्तसेवा ) बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यावल प्रादेशिक वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने ३९ मचाणांचे नियोजन केले होते. या उपक्रमात १५० हून अधिक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, वन व इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रज्वलित पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलात थांबून विविध प्रजातींच्या वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले.

प्राणी प्रगणनेदरम्यान बिबट्या, अस्वल, कोल्हा, लांडगा, ससा, भेकर, निलगाय, रानडुक्कर, चिंकारा, चौशिंगा, काळवीट, साळिंदर यांसारख्या प्राण्यांसह विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. यावर्षी एकूण ४९२ वन्यजीव आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून एकूण २७ हून अधिक प्रजातींचे दर्शन झाले. सहभागी निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी आपले निरीक्षण अभिप्राय स्वरूपात नोंदवले.

या कार्यक्रमासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रणाली (QR Code) वापरण्यात आली होती. रात्रीच्या वेळी जंगलात मचाणावरून निरीक्षण करणे ही निसर्गप्रेमींसाठी थरारक व अविस्मरणीय अनुभूती ठरली. विशेष म्हणजे रावेर वनक्षेत्रात बिबट्याचे दर्शन घडले, तर वैजापूर वनक्षेत्रात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या.

सदर उपक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील, तहसीलदार रावेर श्री. बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक श्री. रविंद्र फालक, वन्यजीव अभ्यासक श्री. अमन गुजर, विविध संस्था, महाविद्यालयीन प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज, उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रथमेश हाडपे आणि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी केले.

या उपक्रमाबाबत समाधान पाटील यांनी सांगितले की, “ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे अडथळा येईल असे वाटत असतानाही निसर्गप्रेमींनी विविध वन्यजीवांचे दर्शन घेतले. अचानक बदललेल्या हवामानामुळे प्राण्यांच्या हालचाली, वर्तन यांचे निरीक्षणही वेगळ्या पद्धतीने अनुभवता आले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In