
कथ्थक शिकणाऱ्या विद्यार्थिनी त्यांच्या गुरूंसमवेत व पालकंसमवेत उपस्थिती
दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित कथा- कथ्थक या कार्यक्रमाच्या कलाकार कु. निधी प्रभू (मुंबई) यांच्याशी सुसंवाद साधण्यात आला. त्यावेळी शहरातील कथ्थक शिकणाऱ्या विद्यार्थिनी त्यांच्या गुरूंसमवेत व पालकंसमवेत उपस्थित होत्या. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कु. निधी प्रभू यांनी कथ्थक विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांचा बालपणीपासूनचा कथ्थक प्रवास त्यांनी विद्यार्थिनींसमोर उलगडला. कथ्थक व फ्लेमिंगो यातील साम्य व फरक त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने मांडला. भारतीय कथ्थक आणि आधुनिकता यांचा सहसंबंध जोडून कथ्थक जनमानसात पुढे कसे न्यावे याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच संरचनाकार म्हणून त्यांचे बॉलिवूड मधील कार्य त्यांनी विस्तृतपणे मांडले व पं. बिरजु महाराज, संजय लीला भन्साळी सारख्या दिग्गजांबरोबर केलेले कार्य त्यांनी मनोरंजक स्वरूपात सांगितले.
अशा प्रकारे कथकच्या उभरत्या नृत्यांगना यांच्या मधील चांगलीच रंगली व सर्व उपस्थित नृत्य कलाकार तसेच त्यांचे पालक चांगलेच भरवून गेले व हा संवाद यशस्वीरित्या पार पडला.