Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणार वापर

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 26, 2025
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

शिर्डी | सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले येथील अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतीच्या कामांचे भूमिपूजन श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे, नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, विश्वस्त परबत नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब भोर, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, देवस्थानचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदी उपस्थित होते.

अगस्ति महाराजांचे दर्शन व महापूजेचा लाभ घेण्याने आनंद झाल्याचे नमूद करून मंत्री झिरवाळ म्हणाले, अगस्ति ऋषींची महती संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. असे पवित्र स्थान देशभरात अन्यत्र कुठेही नाही, असे त्यांनी सांगितले.

दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले आहेत. एकूण ९८ टँकर तपासण्यात आले, त्यापैकी काही परत पाठवण्यात आले.  पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार लहामटे म्हणाले, शासनाकडून दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.

उपसचिव विजय चौधरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागात नुकतीच २८० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये अकोले तालुक्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. के. डी. धुमाळ यांनी केले. तत्पूर्वी, महाशिवरात्री निमित्त पहाटे तीन वाजता मंत्री नरहरी झिरवाळ  यांनी सपत्नीक महापूजा केली.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmtdcMtdc resorts
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In