Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

‘पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 16, 2025
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक संपन्न

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

मुंबई | कराड तालुक्यातील पाल देवस्थान ‘ब’ वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील ‘ब’ वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, पर्यटन विभागाचे उपसचिव श्री.पवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे राहुल श्रीरामे, मेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, ‘पाल’ ला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन परिपूर्ण प्रस्ताव एक महिन्‍याच्या आत सादर करावा. तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पर्यटकांच्या सेवेसाठी ‘पर्यटन पोलीस‘राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन महोत्सवात’ प्रायोगिक तत्वावर 50 पर्यटन पोलीस यांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करावी.

पर्यटन पोलीस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या सवंर्धनासाठी प्रयत्न करतील, असेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismकराडपाल खंडोबा
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In