Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

राष्ट्रीय मसाले परिषद २०२५ चा जैन हिल्स येथे समारोप

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 21, 2025
396 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ संघ या स्पर्धेत होते. त्यातील स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात ३-२ अशा फरकाने नमवित निमाखात विजेतेपदाला ‘जैन सुप्रिमोज’ संघाने गवसणी घातली.

विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्टस एरिना येथे डेक्कन प्रिमियर कॅरम लीग स्पर्धा दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या ‘जैन सुप्रिमोज’ संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, कु. एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान, संघ व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. तीन दिवसांमध्ये १६५ सामने खेळविली गेलीत. या सीझनमध्ये १२ लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केले गेले. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ठ कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोख पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला.

विजयी संघाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघमालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी कौतूक केले आहे.

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग (DPCL) सीझन-३ चे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कॅरम खेळातील अपवादात्मक प्रतिभा ओळखून डेक्कन प्रीमियर लिगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही. डी. नारायण उपस्थित होते. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण, आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस. के. अब्दुल जलील यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित केले. विजेत्यांसाठी, अव्वल खेळाडू आणि संघांना संपूर्ण लीगमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले. जैन सुप्रिमो संघाने प्रथम, द्वितीय स्ट्राइक फोर्स, नव्याभारती स्ट्रायकर्सने तिसरा क्रमांक पटकावला. चार्मी-नार चॅलेंजर्सने अव्वल चार संघांना मागे टाकत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In