Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात उत्साहात प्रारंभ

कलावंत परिचय - ४ (द्वितीय दिन द्वितीय सत्र) श्रींजीनी कुलकर्णी (कथक)

१ जानेवारीस रोजी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन

दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात उत्साहात प्रारंभ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 29, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती…..
जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक घेतले श्री खंडेरायाचे दर्शन….
श्री खंडोबारायावर बेल भंडारा खोबरे उधळून निघाली देवस्वारी व पालखी…
प्लास्टिक मुक्त वकचरामुक्त यात्रेचा संकल्प….

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

नांदेड | दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले.

यावेळी पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले, कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, पंचायत समिती दशरथराव आडेराघो, सरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे, ग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.

यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.

यावर्षी प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केले आहे. तसेच पार्किंग, सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी, वासुदेव सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्रामपंचायतीमार्फत भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आजपासून सुरू झालेली यात्रा  पुढे 5 तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून मोठा पशुधन बाजार येथे या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीची दुकानेही मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी 2 जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे.आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismमाळेगाव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In