Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

जैन इरिगेशन व अंकूर सिडस् तर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी

२० ते २४ डिसेंबर २०२४ देवास, मध्य प्रदेश येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा – पुणे अंतिम विजेता

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 13, 2024
396 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई उपविजेता तर ठाणे तृतीय व कोल्हापूर चौथ्या स्थानी

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. अंतिम सामना मुंबई विरुद्ध पुणे यांच्यात झाला खेळ संपण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी पुणे संघाची इशिता देबनाथ यांनी गोल केला त्या गोलच्या आधारावर पुणे संघाने मुंबई संघावर १-० ने विजय संपादन केला. तृतीय स्थानासाठी कोल्हापूर विरुद्ध ठाणे यांच्यात अटा-तटीचा सामना झाला सामन्याच्या २७ मिनिटात ठाण्याची नेसा बोंद्रे हिने उत्कृष्ट गोल करून ठाणे संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे ठाणे तृतीय तर कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर राहिला.

पारितोषिक वितरण समारंभ – पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी आमदार सौ मधु जैन, जैन इरिगेशनचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षिका चंचल माळी,पिंच बॉटलिंग चे जफर शेख , जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख , डॉक्टर अनिता कोल्हे, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

अंतिम सामना पोलीस अधीक्षकांच्या नाणेफेक व शुभेच्छा – अंतिम सामन्याच्या नाणेफेक व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी क्रीडा संकुल आला येऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेच्या नाणेफेक केले त्यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीच्या पत्रकार राजश्री चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक संघटने चे फारुक शेख व डॉक्टर अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार – कोल्हापूर विरुद्ध ठाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोल्हापूरची संस्कृती शिंगोटे तर अंतिम सामन्यातील मुंबईची अनुष्का मोहिते हिने पटकाविला.*टूर्नामेंट चे सर्वातकृष्ट खेळाडू*संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कृष्ट खेळाडू पुण्याची शर्वरी माने, बेस्ट स्कोरर मुंबईची प्रीशा विराल. बेस्ट गोलकीपर कोल्हापूरची आशावरी पाटील. बेस्ट डिफेंडर ठाण्याची न्यासा बोंद्रे. अंतिम विजेत्यांना पारितोषिक स्पर्धेतील विजय उपविजयी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावलेले पुणे, मुंबई ठाणे व कोल्हापूर या संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ब्रांझ पदक सहित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक ट्रॉफी, पदक व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.

मनोगत – खेळाडूंना डॉक्टर अनिकेत पाटील व सौ मधु जैन यांनी अत्यंत सुरेख अशा शब्दात भावी आयुष्यासाठी खेळ व क्रीडांगण याचे महत्त्व विशद करून स्वतःचे अनुभव कथन केले व शुभेच्छा दिल्या.

पारितोषिक वितरण समारंभाचे समारोपिय प्रस्तावना जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी तर सूत्रसंचालन सरिता खाचणे व आभार प्रा.डॉअनिता कोल्हे यांनी मानले.फोटो१) विजयी व उप विजयी संघा सोबत उभे असलेले डावी कडून रोहिणी सोनवणे, हिमाली बोरोले, अब्दुल मोहसीन, फारुक शेख, अनिल जोशी, जफर शेख, डॉक्टर अनिकेत पाटील, मधु जैन , चंचल माली , प्रा डॉ. अनिता कोल्हे,राजेंद्र सावंत, आमिर शेख, प्रतीक्षा देवाग, एनी पॉल, ताहेर शेख, गुरू प्रसाद, छाया बोरसे, आदि दिसत आहे.२) स्पर्धेचे नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, फारुक शेख, राजश्री चौधरी आदी दिसत आहे

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In