Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु

श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री

तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 9, 2024
396 4
0
550
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

मुंबई | मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुईझ्झु यांनी नुकतेच येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत भेटीवर आलेल्या अध्यक्ष डॉ मोहमद मुईझ्झु यांचे सन्मानार्थ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टो) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मालदीवच्या अध्यक्षांसोबत त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ होते.

आपल्या मुंबई भेटीत आपली प्रसिद्ध बॉलीवूड निर्माते व अभिनेते यांचेशी फलदायी चर्चा झाल्याची माहिती देताना श्री. मुइझ्झु यांनी बॉलिवूड निर्माते व दिग्दर्शक यांना संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी तसेच चित्रीकरणासाठी मालदीवमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मालदीवमध्ये दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या शक्यतेचा देखील विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. मालिका व चित्रपटांमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव आणि भारत पुढील वर्षी राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी करत आहेत असे सांगून राष्ट्रपती श्री. मुइझ्झु यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या यशस्वी भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

मालदीवच्या अध्यक्षांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, नवी दिल्लीत स्वीकारण्यात आलेले व्हिजन डॉक्युमेंट उभय पक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरु केल्यामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांना मदत होईल आणि त्यातून पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा प्रमुख भागीदार आहे आणि एक घनिष्ट मित्र आहे. भारत आणि मालदीवमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, आर्थिक व व्यापार संबंध आहेत. भारताचे ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘सागर व्हिजन’मध्ये मालदीवला विशेष स्थान असल्याचे राज्यपालांनी अध्यक्ष श्री. मुइझ्झू यांना सांगितले.

भारत आता मालदीवच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपालांनी भारतीय व्यावसायिकांना मालदीवशी सहकार्य वाढविण्यात रुची असल्याचे सांगितले.

भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स संपूर्ण मालदीवमध्ये काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय शिक्षक देखील मालदीव मध्ये सेवा देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी मालदीवचे अध्यक्ष आणि त्यांच्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ प्रीती भोजनाचे आयोजन केले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम नौदल मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा आदी उपस्थित होते.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMaldives Tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In