Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गति होना तो ‘चरण’ बढ़ाये, सफलता के लिये ‘आचरण’ शुद्ध  करे!  – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

एमटीडीसीचा आयसीआरटीच्या ‘जबाबदार पर्यटन पुरस्कारा’ने गौरव

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित होणार

गति होना तो ‘चरण’ बढ़ाये, सफलता के लिये ‘आचरण’ शुद्ध करे! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 8, 2024
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

•||• *महावीर वाणी* •||• दि. 08/०9/२०२४ स्वाध्याय भवन, जळगाव •||•

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव| विखूरलेल्या मोत्यांपासून मोत्यांची माळ बनते, मात्र ती एका धाग्यात गुंफली जाते, तेव्हाच माळ बनते. त्याचप्रमाणे चांगल्या आचरणातून एक-एक चांगल्या गुणांचा, मुल्यांचा अंगिकार करुन तसे ‘आचरण’ केले तर मनुष्याचे चारित्र्य घडते. आपले आचरण हे आत्माला दिशा देणारे असावे. ‘गती’ आणि ‘प्रगती’ यात फरक आहे. ‘गती’ ला दिशा असतात आणि चरण आवश्यक असते तर ‘प्रगती’ ला एकच दिशा असते आणि यात ‘आचरण’ खूप मोलाचे असते. ज्यांचे आचरण शुद्ध विवेकपूर्ण ते प्रगती साधू शकतात.

‘जीनवाणी’चा सारांश म्हणजे शुद्ध आचरण होय. आजच्या परिस्थितीत चित्र, फोटो याला महत्त्व दिले जाते, मात्र चारित्र्यावर काम केले जात नाही. चित्र सुंदर करण्यासाठी प्रयत्नपूर्वक वेळ घालविला जातो. मात्र चारित्र्य निर्माण करण्यासाठी मनुष्याजवळ वेळ दिसत नाही. पुर्वी धनापेक्षा चारित्र्याला महत्त्व होते तर आता चारित्र्यापेक्षा धनाला महत्त्व दिले जाते. असे स्पष्ट विचार धर्मसभेत शासनदीपक प.पु.सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.

‘संवत्सरी पर्वा’ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सहनशील झाले पाहिजे. शत्रुलासुद्धा आपला मित्र बनविता येईल, असी कृती आपल्या हातून घडली पाहिजे. दुसऱ्यांविषयी असलेले वैरत्व संपविले पाहिजे. क्षमायाचना केली पाहिजे. आपली चुक किंवा नसेल तरीसुद्धा क्षमायाचना केली पाहिजे. क्षमा करणे व क्षमा मागणे ही दोघंही कृती ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळवून देणारी आहे. असे विचार आरंभी परमपूज्य प. पु. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.

‘पर्यूषण पर्वा’ निमित्त प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी ‘अंतगडदसा’ सूत्राचे वाचन केले. यात उपासना, तपस्याचे महत्त्व समजून सांगितले. शरिरासाठी आपण सर्व काही करतो मात्र मन:शांतीसाठी काहिही करत नाही. आध्यात्मिक आरोग्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आत्मसमाधानासाठी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे, त्यातूनच परिवर्तन घडते. इंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्क्रिन टाईम कमी करणे, आत्मानुशासन म्हणजे स्वत:चे स्वत:वर नियंत्रण ठेवणे. विवाद व विग्रह टाळून संवाद घडविला पाहिजे. वैर आणि ईर्ष्या संपवून ‘मैत्रीभाव’ विकसीत केला पाहिजे. स्वत:च्या जीवनात नियमावलीनुसार जगले पाहिजे. प्रेम, वात्सल्य, मैत्रभाव वाढविण्यासाठी सामुहिक, पारिवारिक साधना, प्रार्थना केली पाहिजे. यातूनच करुणाभाव विकसीत होतो, सुरक्षा कवच निर्मित होते असे प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. म्हणाले. _शब्दांकन – देवेंद्र पाटील, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthJain HillsJain'skokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In