सायंकाळी ठिक ५.३० ते ६.०० या कालावधीत भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन

|| जयतू कोकण भूमी || ।। राजराजेश्र्वर भगवान श्री परशुराम महाराज की जय ।।
कोकण भूमीचा आज वाढदिवस श्रावण कृ. त्रयोदशी या दिवशी आपल्या लाडक्या कोकण भूमीचा वाढदिवस असतो. श्रावण कृष्ण त्रयोदशी या दिवशी भगवान श्री परशुरामांनी कोंकण भूमीच्या निर्मितीचे कार्य पूर्ण केले. याप्रसंगी त्यांनी चिपळूण येथे श्रीरामेश्वरांची स्थापना केली आणि रामतीर्थ तलाव निर्माण केला. याचा संदर्भ व्याडेश्र्वर माहात्म्य या ग्रंथात सापडतो. जी भूमी आपल्याला अन्न, वस्त्र व निवारा देते, आपले संरक्षण करते त्या भूमीला श्रावण कृ. त्रयोदशी या दिवशी सायंकाळी वंदन करा अशी आज्ञा भगवान श्री परशुराम यांनी संपूर्ण कोकणवासीयांना दिली आहे.
सालाबादप्रमाणे श्रावण कृ. त्रयोदशी शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ठिक ५.३० ते ६.०० या कालावधीत भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन केले जाणार आहे. आपण सर्व भाविकांनी प्रत्यक्ष मंदिरात येऊन कोकण भूमी पूजन कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती. आपणाला प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नसल्यास चिपळूण येथील रामेश्वर मंदिर, रामतीर्थ परिसर येथे आपण जाऊन कोकण भूमीचे पूजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अथवा आपण आपापल्या घरात देखील कोकण भूमीचे पूजन करू शकता.
असे करावे पूजन – आपल्या घराच्या अंगणातील, बागेतील जमिनीला वंदन करावे, हळदकुंकू अर्पण करावे, उदबत्ती, निरांजन दाखवावे व दूध साखरेचा किंवा नुसता साखरेचा नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करावी. आपण आपल्या घरी केलेल्या पूजनाचे फोटो आम्हाला पाठविल्यास श्री परशुराम मंदीर समूहावर ते प्रसिद्ध करण्यात येतील.
फोटो कृपया खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.
- श्री. जयदीप जोशी – 9028980125,
- श्री. शंकर कानडे – 7774021100
