Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
४२३ युवतिंचा सहभाग असलेल्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

शिवतीर्थ मैदानावर तरूणींचा दहिहंडी महोत्सव

४२३ युवतिंचा सहभाग असलेल्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 25, 2024
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहिहंडीचे आयोजन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान तरूणींचा दहिहंडी महोत्सव आयोजित केला आहे.

यामध्ये नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. आय. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करणार आहेत.

विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देणार आहेत. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करणार आहेत. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरण होणार आहे. ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हा एकमेव तरूणींचा दहिहंडी महोत्सव आहे ज्या दहिहंडी फोडण्याचा मान फक्त आणि फक्त महिला गोविंदा पथकांना देण्यात येतो. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे.

आयोजनाचे हे १६ वे वर्ष असून जळगावकर नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. असे युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsKrishna JanmashtamimahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismदहीहंडी
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In