Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ वारसा यादीत समावेशासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित उपक्रम

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न

‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ वारसा यादीत समावेशासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 1, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जागतिक वारसा नामांकनाबाबत युनेस्कोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांचे गुरुवारी मार्गदर्शन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

मुंबई | राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत मुंबई येथे आज गुरुवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती असणार आहे.

दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6-30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश हा वैशिष्ट्यपूर्ण वारसा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. शर्मा यांच्या मार्गदर्शनाबरोबरच गुरगाव  येथील द्रोण संचालक तथा प्रसिद्ध वास्तूविशारद डॉ. शिखा जैन या भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश  (मराठा मिलीटरी लॅण्डस्केप ऑफ इंडिया) याविषयावर सादरीकरण करणार आहेत.

श्री. शर्मा हे दुसऱ्या दिवशी (शुक्रवार, दिनांक 2 ऑगस्ट) बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट देणार आहेत. दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्री. शर्मा हे लोहगड किल्ल्यास (जि. पुणे) भेट देणार आहेत.

राज्यातील गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत समावेशाच्या दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी सांगितले.

दरम्यान, जागतिक वारसा केंद्र समितीचे 46  वे अधिवेशन दिनांक 21  ते 31 जुलै या कालावधीत नवी दिल्ली येथे झाले. या अधिवेशनादरम्यान जागतिक वारसा नामांकनासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 12 किल्ल्यांचे स्केल मॉडेल (प्रतिकृती) आणि माहितीफलक प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील प्रस्तावित 12 किल्ल्यांविषयी राज्य शासनाचा पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालये आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली आणि आयसीओएमओएस, इंडिया यांच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

Tags: agro tourismChatrapati ShivajiIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRaigadratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In