Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
Sawatsada Waterfall l सवतसडा धबधबा l Video

सिन्नरचं गोंदेश्वर ऊर्फ गोविंदेश्वर मंदिर

२५ ऑगस्ट रोजी भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन

Sawatsada Waterfall l सवतसडा धबधबा l Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
462 25
0
668
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोकणातील प्रसिद्ध आणि सुरक्षित धबधबा

सवतसडा l मान्सून सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते मॉन्सून पर्यटनाचे. त्यातल्यात्यात सह्याद्री पर्वत रांगांमधील धबधब्यांचं वेड जरा जास्तच आहे.

मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.

या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे नॅशनल हायवे १७च्या (NH 17) उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो. हाच तो ‘सवतसडा’ हे नाव मनामध्ये नक्कीच काही प्रश्न उभे करते. या सवतसड्याची कथा इथले सांगितली जाते ती अशी की….

अख्यायिका l १) फार पूर्वी दोन सवती भांडतांना या कड्यावरून खाली पडल्या तेव्हापासून धबधबा सवतसडा म्हणुन ओळखला जातो.

२) स्थानिक सांगतात ती विस्तृत कथा अशी – इथे एका गृहस्थाच्या दोन बायका होत्या. त्यातील एक स्त्री दुसरीची वेणी घालून द्यायची इच्छा व्यक्त केली. त्या स्त्रीला शंका आली म्हणून प्रत्यक्ष वेणी घालत असताना स्वतःच्या पदराची गाठ दुसरीच्या पदराला गुपचूप गाठ बांधली. वेणीफणी झाल्यावर डोंगरकड्यावरून आवडतीला ढकलून दिले. मात्र एकमेकिंच्या गाठ बांधलेली असल्यामुळे त्या दोघीही खाली कोसळून मरण पावल्या तेव्हापासन या निसर्गरम्य धबधब्याला ‘सवतसडा’ हे नाव पडलं.

धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.

पावसाळ्याच्या दिवसात येथे भाजलेले, बटर चिझने माखलेले मक्याचे कणीस खण्याची मजा काही औरच आहे. तुषार आपल्या अंगावर घेऊ शकतात. पाऊस खूपच पडत असेल तर याचे तुषार अगदी दूरपर्यंत पसरून धुके असल्याचा भास निर्माण होतो. अंदाजे चाळीस पन्नास फूट उंचीवरून पाणी कोसळते तेथे म्हणजेच धबधब्याचे मुख अर्धगोलाकार असल्याने वेगवान जलधारा कड्यावरून खाली उथळ अशा कुंडात (पाण्याला जास्ती खोली नाही) कोसळतात. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच प्रवाहित असतो.

परशुराम घाटाच्या मध्यभागी असलेल्या परशुराम या गावी अगदी स्टार लेव्हलची निवास भोजन व्यवस्था येथे होऊ शकते. परशुराम गाव अगदी लहान असुन येथे होम स्टे, वाडी, कॉटेजेस, रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. आणि तुम्ही धार्मिक पर्यटनासाठी कोकणाची सफर आखली असल्यास याच गावातील परशुराम मंदिरच्या भक्तनिवासाचा सात्विक पर्याय तुम्ही निवडू शकतात. धबधब्यापासुन चिपळूण शहर अगदी ५ किमी अंतरावर असल्याने तिथे हॉटेल्सचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू!… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
    by Rajesh Bhagwat
    October 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोली
    by Rajesh Bhagwat
    October 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (9)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,603)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismchiplunIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismParshuram Temple ChiplunRATNAGIRI
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In