अति सुंदर नक्षीकाम असलेले चालुक्यकालीन शिवमंदिर
नाशिकपासून अवघ्या तीस कि.मी अंतरावर असलेल्या सिन्नरः शहरात चालुक्यकालीन अस एक अति सुंदर तरीही उपेक्षित राहिलेल मंदिर आहे. हे मंदिर गोदेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जात. सहा मंदिरांच्या या मंदिर संकुलातल मध्यभागी असलेल गोंदेश्वर महादेव मंदिर हे प्रमुख मंदिर असून या गोंदेश्वराची दररोज पूजाअर्चा होत असते.
सुमारे ३५० x २७० फूट क्षेत्रफळाच्या चौकोनी जागेवरच्या प्राकाराच्या मधोमध २५० चौ फूट जागेवर एका उचवट्यावर हे मंदिर संकुल उभं राहिलेलं असून चहूबाजूनी तट बांधलेला आहे. मुख्य मंदिराची उंची सुमारे १५० फूट असून मंदिराच्या बाहेरच्या बाजुवर अप्रतिम अस शिल्पकाम केलेले आहे. कोरीव काम नसलेली अगदी एक इंचही जागा शोधून ही दिसत नाही. तसंच बारीक कोरीव काम इतर चारही मंदिरावर केलेल असल्याचे दिसते.
मुख्य शिवमंदिराला गर्भगृह, सभागृह आणि द्वार मंडप असून सभामंडपाचे छत अष्टकोनी आकाराचं आहे. त्यावर कीर्तीमुख कोरलेली असून मध्यभागी बारा पाकळ्यांच्या कमलपुष्पांची सुंदर रचना केलेली असल्याचं दिसतं. कडक उन्हाळ्यात देखील मंदिराच्या आत अतीव थंडावा असतो.
मंदिर पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली असलं तरी मंदिराच्या विशाल आवारात फारशी झाडे लावलेली दिसत नाहीत. मंदिर तस दुर्लक्षितच असल्याची जाणीव सतत होत असते. मंदिराची फारशी पडझड झाल्याचं दिसत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.
याशिवाय नाशिकमध्ये नवशा गणपती मंदिर, भक्तिधाम, रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर, मुक्तिधाम, कालिका मंदिर, वेदमंदिर, टाकळीचा मठ, चामराज लेणी. कुशावर्त तीर्थ आदी मंदिरही आहेत. अशा या देवांच्या नगरीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,600)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)




