Tuesday, September 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जैन टिश्यू कल्चर रोपांच्या बायो इम्युनायझेशनसाठी सामंजस्य करार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 7, 2025
396 4
0
550
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केळी टिश्यू कल्चर रोपांवरील फ्युसारियम विल्ट रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जैन इरिगेशनचा आयसीएआर-सीआयएसएच, अॅग्रीइनोव्हेट इंडिया यांचा सामंजस्य करार

जळगाव | जैन इरिगेशन जळगाव व भारतीय कृषी अनुसंधान (ICAR),  सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर रिसर्च लखनौ(CISH) आणि अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, यांच्यात जैन केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमध्ये फ्युसारीयम विल्ट रोगाला प्रतिकार करणाऱ्या तंत्रज्ञानासाठीचा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच करण्यात आला. या करारावर डॉ. टी, दामोदरन, संचालक सीआयएसएच लखनौ, डॉ. प्रवीण मलीक, सीईओ, अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली, डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांनी डॉ. व्ही. बी. पटेल, उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान, डॉ. बालकृष्ण यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल ढाके यांच्यासह २०० प्रगतीशील केळी बागायतदारांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार सोहळा पार पडला. 

टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती करत असतानांच्या प्रकियेतच बायोइम्युनायझेशन करण्याचे तंत्रज्ञान आय़सीएआर, सीआयएसएच, लखनौ यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे प्रतिकारक रोपांची निर्मिती होऊन ती रोप फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालू शकतील. रोपांच्या प्रायमरी व सेकंडरी हार्डनिंगमध्येसुद्धा बायोइम्युनायझेशन करण्यात येणार आहे. 

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, ‘भारतात  फ्युसारियम विल्ट रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात व आंतरराष्ट्रीय सतरावर जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते स्वीकारून केळी उत्पादकांना सशक्त व प्रतीकारक रोपांची निर्मिती व पुरवठा करण्याचे आमचे धोरण आहे. आयसीएआर सोबतचा तंत्रज्ञान हस्तांतराचा हा करार म्हणजे केळीला सुरक्षित ठेवण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे.’ डॉ. व्ही. बी. पटेल यांनी ‘या तंत्रज्ञानाने केळी उत्पादकांना फायदा होईल’ असे म्हटले तर डॉ. टी दामोदरन यांनी ‘हे तंत्रज्ञान कसे काम करते यावर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन ही देशामधील अग्रगण्य कंपनी असल्याने या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होईल.’

डॉ. प्रविण मलीक यांनी या तंत्रज्ञानाने केळीची शेती कशी शाश्वत करता येईल असे म्हटले तर डॉ. के. बी. पाटील यांनी प्रत्येक गावाच्या,  जिल्हा तसेच राज्याच्या सीमेवर टायर बाथ, फुट बाथ ही संकल्पना राबवून वाहनांच्या चाकाद्वारे किंवा मजूरांच्या पायातील बूट चप्पलद्वारे या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याचे सांगितले. बायोइम्युनायझेशन तंत्रज्ञानामुळे फ्युसारियम विल्ट रोगाला आळा घालता येईल व रोगाच्या  व्यवस्थापनासाठी मदत होईल.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In