Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 2, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी हे बहिणाईंची गाणी आणि कविता कशी सुचते, ती कशी वाचावी याविषयावर उपस्थितांशी साधणार संवाद

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन येथे उद्या दि. ३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी हे बहिणाईंची गाणी आणि कविता कशी सुचते, ती कशी वाचावी याविषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. तसेच साहित्यिक प्राध्यापिका वंदना नेमाडे ह्या लेवागणबोलीचा गोडवा या विषयावर संबोधन करतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन असतील. या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त, बहिणाबाईंच्या नातसून, पणतसून, चौधरी वाड्यातील बंधू-भगिनी, साहित्यिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी (ज्यांच्या अभ्यासक्रमात बहिणाईंची कविता समाविष्ट आहे) उपस्थित राहणार आहेत. याप्रंसगी उपस्थितीचे आवाहन ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.

प्रमुख पाहुणे परिचय – श्री. संजय चौधरी हे मराठीत दीर्घकाळापासून काव्यलेखन करणारे एक महत्त्वाचे कवी आहेत. काव्य लेखनासोबतच त्यांना असलेली कवितेची जाण खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत ‘माझं इवलं हस्ताक्षर’ (राजहंस प्रकाशन, पुणे) आणि ‘कविताच माझी कबर’ ( ग्रंथाली प्रकाशन, मुंबई) हे दोन काव्यसंग्रह त्यांनी मराठी साहित्य सृष्टीला दिलेले आहेत. या दोन्ही संघांना मानाचे – महत्त्वाचे जवळजवळ पन्नास पुरस्कार आणि जाणकार समीक्षकांचे प्रेम लाभलेले आहे. चिंतनशील पद्धतीने गंभीर काव्यलेखन करणारा हा कवी मानवी अस्तित्व, जीवनाचा आणि जगण्यातील चढ- उतारांचा वेगवेगळ्या अंगाने शोध घेऊ पाहतो. ‘माझ्या वयाची कविता’ हीदेखील आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडते. वयासाठी केवळ आकडा महत्वाचा नसून भावनिक वय महत्त्वाचे आहे, असा विचार ही कविता आपल्यापुढे ठेवते.

प्राध्यापक डॉ. वंदना नेमाडे ह्या कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे सीनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना कविता करण्याचा छंद असून त्यांच्या स्वलिखित १०० कविता आहेत.

Tags: agro tourismBahinabaiIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In