
सकाळ टुरिझम एक्स्पो 2024 | देश, विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या |
पुणे | देशातील आणि परदेशातील आकर्षक पर्यटनस्थळांची माहिती घेऊन आपल्या आवडीनुसार सहलीचे नियोजन करण्याची पर्वणी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. येत्या शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट पासून रविवार ता. २५ पर्यंत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत एक्स्पोला भेट देता येईल. या एक्स्पो मध्ये टुरिझम क्षेत्रातील विविध कंपन्यांमार्फत अनेक सहलींविषयी माहिती मिळेल. त्यासाठीचे नियोजन, बजेट आणि अनेक ऑफर्सची माहिती मिळेल.
या एक्स्पोसाठी ‘केसरी टूर्स’ टायटल स्पॉन्सर असून, पॉवर्ड बाय ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’ आणि ‘कॅप्टन नीलेश हॉलिडेज’ आहेत. ‘स्मिता हॉलिडेज’, ‘सफरट्रॅव्हल्स’, ‘नीम हॉलिडेज’ हे असोसिएट प्रायोजक आहेत. तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.
देश-विदेशातील प्रमुख पर्यटनस्थळे, जागतिक वारसा आणि संस्कृती हेरिटेज ठिकाणे, अद्भुत निसर्गसौंदर्य असलेली स्थळे, जंगल सफारी, आरोग्यविषयक सहली, धार्मिक पर्यटन, जगभरातील भन्नाट समुद्रकिनारे, वास्तुकलेचा अनुभव देणारी स्थळे, अप्रतिम पद्धतीने रचना केलेली शहरे आणि मुलांची पसंती असलेले मनोरंजनाचे स्पॉट, विविध प्रकारच्या क्रूझवरील सहली आदी ठिकाणच्या सहलींसाठी या एक्स्पोच्या माध्यमातून बुकिंग करता येतील. त्यासाठी सहल कंपन्यांचे मुबलक पर्याय एक्स्पोमध्ये उपलब्ध आहेत.
येत्या सुट्टीतील सहलीचे करा नियोजन ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’चे शुक्रवारपासून आयोजनटुरिझम एक्स्पोबद्दल….
■ कधी : २३, २४ व २५ ऑगस्ट
■ कुठे : हॉटेल सेंट्रल पार्क, जेएम रोड, डेक्कन
■ केव्हा : सकाळी १० ते रात्री ८ पुणे
■ सुविधा : प्रवेश आणि पार्किंग मोफत. व्हॅले पार्किंग उपलब्ध.