Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी

२ ते ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन

महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 8, 2023
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार… पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’

मुंबई l राज्याचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आले असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री श्री.लोढा म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ दि.28 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. दि. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टीमीडिया लाईट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले,मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छता गृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात असून उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी.एन.दास, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार वर्षांपूर्वीची पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी आहे. हजारो वर्षांपूर्वीची आणि उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेली लेणी, निसर्गसौंदर्याने नटलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावजवळील लेणी, महाशिवरात्रीला आणि श्रावणात भाविकांसह पर्यटकांची होते गर्दी संपूर्ण विश्वाला आपल्या चित्र शिल्पांनी मोहिनी घातलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद शहरापासून… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या हस्ते महाआरती; शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष**जळगाव दि.१० प्रतिनिधी* – ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक ३९ दुर्गांचे विहंगम दर्शन… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे महाराष्ट्रातील एकमेव मंगळग्रहाचे मंदिर – अमळनेर येथे महाराष्ट्रातील एकमेव असे मंगळ ग्रह मंदिर आहे. मंगळ ग्रहाच्या दोष निवारणार्थ काही उपायही शास्त्रकारांनी सुचवले आहेत. या श्रद्धेपोटी मंगळग्रह मंदिराचा शोध भाविकांकडून घेतला जातो. नवग्रहांची भारतात अनेक मंदिरे आहेत मात्र, फक्त मंगळ… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही, मात्र हे मंदीर साडेतीनशे वर्षां पूर्वीचे असल्याचं सांगितले जाते. माचनूर गावात प्रवेश केल्यावर काळ्या पाषाणात बांधलेला प्रथम सिद्धेश्वर मंदिर समूह लागतो. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवळ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीत… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismगेट वे ऑफ इंडिया
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In