Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
२ ते ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन

महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम

महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा अर्थसंकल्प... पर्यटनमंत्री

२ ते ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 9, 2023
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होणार

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले यांची निवड

जळगाव l भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जैन धर्मीयांतर्फे दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दि. २, ३ व ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात येईल. भव्य महोत्सवाच्या नियोजनासाठी सकल जैन श्री संघाचे आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समाजबांधवांची बैठक उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सर्वानुमते भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले यांची निवड करण्यात आली.

दादावाडी जैन मंदिराच्या सभागृहात झालेल्या समाजबांधवांच्या सभेला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, साै. रत्नाभाभी जैन, श्रीमती नयनतारा बाफना, राजेश श्रावगी जैन, ललीत लाेडाया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, विजय चाेरडिया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी, भारती रायसाेनी, स्वरुप लुंकड, राजकुमार सेठिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमूते विनाेद ठाेले यांची भगवान कल्याणक महोत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महोत्सव ऐतिहासिक यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या जातील.

‘भारतात जैन समाजात श्री संघीय कार्यासाठी जळगावचे नाव सुप्रसिध्द आहे. पूर्वजांनी घेतलेल्या अथक सांघिक परिश्रमामुळे हे शक्य झाले. तीच आदर्श परंपरा जोपासल्यास समाजात एकता, सलोखा कायम ठेवत आपला आदर्श देशातील सर्व श्री संघ घेतील. सर्वांनी एकदिलाने सहकार्य करूया, जन्मकल्याणक मनवू या असे आवाहन करत युवकांनी आपआपसात उत्तम समन्वय साधत समाज कार्यात आपले योगदान द्यावे, त्यायाेगे जैन दर्शन, धर्माची सेवा करण्याचे आवाहन सभाध्यक्ष सुरेशदादा जैन यांनी केले.

याप्रसंगी अशाेक जैन, प्रदीप मुथा यांनीही मार्गदर्शन केले. सभेस अनिश शहा, अतुल सतिषदादा जैन, पारस रांका, अमर जैन, विजया मलारा, पुष्पलता बनवट, जयेश कामानी, विजय चाेपडा, विजय सांड, विजय खिवसरा, किशाेर भंडारी, धमेंद्र जैन, अजय राखेचा, निता जैन, आनंद चांदीवाल, चंद्रकांता मुथा, निलिमा रेदासनी, नम्रता सेठिया, सुलेखा लुंकड, स्नेहलता सेठिया, नलिनी जैन, पियुष संघवी, नरेंद्र बंब, संजय रेदासनी, विशाल चाेरडिया, नितीन चोपडा, अजित काेठारी, प्रविण पगारीया, रिकेश गांधी, ज्याेती काेटेचा, ललिता चाेरडिया, ज्याेती ललवाणी, प्रशांत पारख, किशाेर भंडारी, मनिष लुंकड, सुधीर बांझल, सचिन चाेरडिया, अपुर्वा राका, श्रेयस कुमट, अनिल पगारीया, उदय कर्नावट आदि कार्यकर्ते उपस्थित हाेते. यांच्यासह समाजातील सर्व महिला मंडळ, युवा मंडळ, विविध मंडळांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थीत होते. सभेचे सूत्रसंचलन स्वरूप लुंकड यांनी केले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भगवान महावीरांनी ‘अहिंसा’ हा दिव्य-संदेश जगाला प्रखरपणे दिला व त्याकाळी विविध अनाकलनीय रुढी, परंपरा त्यांनी हद्दपार केल्या. मानवी जीवन अधिक सुकर करत त्यांनी माेक्ष प्राप्तीसाठी मार्ग दाखविला. वर्तमानात महात्मा गांधींनी ‘अहिंसा’ हे महान तत्व केद्रस्थानी ठेवत भारत या विशालकाय देशाला पारतंत्राच्या जाेखडातून मुक्त केले व स्वतंत्रता मिळवून दिली. हाच महत्वाचा संदेश विविध कार्यक्रमांतून देण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्ष विनोद ठोले यांनी व्यक्त केला.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दि. २, ३ व ४ एप्रिल असा तीन दिवस असेल. मुख्य कार्यक्रम दी. ४ रोजी होईल. शोभायात्रा (वरघोडा), समाज प्रबोधनपर विविध स्पर्धा, सामाजीक संदेशपर नाटिका, भगवान महावीरांच्या जीवनावर प्रसिद्ध वक्ता तर्फे भाषण, प्रभूंचे जीवन दर्शन, रक्तदान, आराेग्य सेवा जागृती आदी कार्यक्रमांसह समाजातील महिला व लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल अशा प्रबाेधनपर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व युवा मंडळ, महिला मंडळ व सकल जैन श्री संघाचा सिंहाचा वाटा असतो.

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू!… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
    by Rajesh Bhagwat
    October 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोली
    by Rajesh Bhagwat
    October 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismJainkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In