Sunday, April 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
देव सोमेश्वर, रत्नागिरी

Kuldaivat

कोकणातील इच्छापूर्ती गणेश

गांधीतीर्थ येथे महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी औचित्याने विशेष कार्यक्रम

देव सोमेश्वर, रत्नागिरी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 19, 2021
479 5
0
665
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्राचीन शिवमंदिर

रत्नागिरी शहरापासून अगदीच काजळी नदीच्या तीरावर सोमेश्वर नावाचे छोटेसे गाव वसलेले आहे. पूर्वी ही नदी नावेने ओलांडून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर गावी जावे लागायचे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या गावाला तिन बाजूने पाण्याने वेढलेले आहे. काजळी नदीवर 2007 साली नवीन पूल झाल्याने आता सोमेश्वर देवस्थानास जाण्यासाठी आपल्याला वाहनाने थेट मंदिर परिसरात पोहचता येते.

पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्वार आठवले आडनावाच्या एका सत्पुरुषाने सोळाव्या शतकात केला असल्याची माहिती मिळते. त्यापूर्वीची माहिती मिळू शकत नाही मात्र तेव्हा पासून आजपर्यंत हे मंदिर सुस्थितीत असल्याने आज पर्यंत कोठलीही डागडुजी केली गेलेली नाही. चारही बाजूंनी भक्कम दगडी तटबंदी, विस्तीर्ण प्रांगण असलेल्या या मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस तीन आणि उजव्या हाताला तीन अशा एकूण सहा दीपमाळा दिसतात. सोमेश्वर गावात स्थायिक झालेल्या सोहनी, आठवले, दामले, केळकर, फडके अशा चित्पावन घराण्याच्या कुलबंधवांनी त्या बांधल्या असल्याची माहिती पुजारी मंदार सोहनी देतात.

अतिशय सुबक बांधणीचे सभागृह आणि आतमध्ये गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभारा आणि सभागृह यावर कौलारू छत आहे.  सभागृहात असलेल्या लाकड़ी खांब आणि तुळयांवर बारीक कोरीवकाम केलेलं आहे. गाभाऱ्याबाहेर काळ्या पाषाणातील नंदी शिल्प तसेच कासव प्रतिमा कोरलेली आहे.

या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात असलेली भव्य स्वयंभू शिवपिंडी. पिंडीची शाळुंखा ही मध्यभागी खोलगट भागात आत मध्ये आहे बाहेरून दर्शन होऊ शकत नाही. मात्र सोवळं नेसून गाभाऱ्यात प्रवेश केल्यास दर्शन होऊ शकते. पिंडीवर तांबे आणि चांदीचा असे दोन नागफण्या आहेत. या मंदिरात नित्य पूजा गुरवामार्फत केली जाते. तर मंदार प्रकाश सोहनी हे पुजारी म्हणून काम कर बघतात. त्यांच्यामार्फत दररोज सकाळी आठ ते दहा या वेळात भाविकांसाठी अभिषेक, पूजा, एकादशणी अशी कामे केली जातात.

पंचायतन असलेल्या सोमेश्वर मंदिर परिसरात श्री देव रवळनाथ, श्री भरडीण देवी, श्री विठ्ठलादेवी अशी मंदिर आहेत.

त्यामुळे भक्त मंडळींनी तेथे जाणेपूर्वी श्री. विनायक सदाशिव सोहोनी, सोमेश्वर यांना आधी कळवल्यास पूजेची राहाण्या जेवणाची व्यवस्था नीट होते.

Tags: beach near ratnagiribeach resortsdapoli beacheskokan beacheskokan tourismplaces to see in RatnagiriRATNAGIRIratnagiri tourismShri SomeshwarTourism after Lockdownलॉकडाऊन नंतरचे पर्यटनश्री सोमेश्वर मंदिर रत्नागिरी
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन

October 19, 2025
किल्ले शिवनेरी: महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह
ऐतिहासिक ठिकाणे

किल्ले शिवनेरी: महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह

September 3, 2025
वीकेंडसाठी धुळ्यातील टॉप 10 ठिकाणे!
ऐतिहासिक ठिकाणे

वीकेंडसाठी धुळ्यातील टॉप 10 ठिकाणे!

August 22, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In