Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

किल्ले शिवनेरी: महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह

‘ओटीएम २०२६’ महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

मुंबई | हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या अमृतमहोत्सवानिमित्त २० वे रिजनल कन्व्हेन्शन ताज लँड्स एंड, वांद्रे येथे पार पडले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शनमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

या कन्व्हेन्शन कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून, पर्यटनाला अधिक चालना मिळावी, या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक ओळख मिळण्यासाठी कन्व्हेन्शनमध्ये झालेला संवाद मोलाचा ठरला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले, पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळावी, म्हणून महाराष्ट्र पर्यटन एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जा मिळावा, म्हणून आम्ही आदरातिथ्य क्षेत्राला आमच्याबरोबर काम करण्याचे आमंत्रण देत आहोत.

महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले की, ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांचा, यात डहाणूमधील पारनाका, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर यांचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये पाण्याखालील पर्यटन प्रकल्पाचेही अनावरण करण्यात आले आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदारचे पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम बेट तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या रिजनल कन्व्हेन्शनमध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीनेसहाय्यक संचालक सुशील पवार व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

एचआरएडब्ल्यूआय अध्यक्ष जिमी शॉ यांनी सांगितले की, १९५१ मध्ये असोसिएशनची स्थापना झाली. असोसिएशनने पश्चिम भारतात आपले स्थान अधिक बळकट केले. या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पर्यटन उद्योगाला अधिक चालना आणि बळकटपणा देण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी अभिनेते व दिग्दर्शक बोमन ईराणी यांनी असोसिएशनच्या माजी अध्यक्षांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In