Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जळगाव जिल्ह्यात इकोटुरिझमला मिळणार चालना

गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये सायरन

जळगाव जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव जिल्ह्यात इकोटुरिझमला मिळणार चालना

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निसर्ग संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार यांचा समन्वय साधण्यावर भर

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील निसर्गवैभवाचा शाश्वत उपयोग करत इकोटुरिझम (Ecotourism) क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील वनपर्यटन स्थळांचा विकास, पर्यावरणस्नेही उपाययोजना आणि स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जळगाव जिल्हा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक निसर्ग पर्यटन स्थळे असून, त्यामध्ये गिरणा नदी परिसर, हतनूर धरण परिसर, सातपुडा डोंगररांगा आणि स्थानिक जैवविविधता असलेले भाग महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये बायोटॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची सोय, सायकल ट्रॅक, निसर्गशिबिरे, माहिती फलक, आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा प्रचार यांचा समावेश आहे.

बैठकीत वन विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्यात सशक्त समन्वय साधून प्रकल्प राबवण्यावर सहमती दर्शवण्यात आली. विशेषतः स्थानिक युवकांना इकोटुरिझम मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे, होम-स्टे योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे, तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, “जळगावच्या निसर्गवैभवाचा संवर्धनासोबतच शाश्वत वापर करून रोजगार व अर्थकारण वाढवणे हे आपले उद्दिष्ट आहे”. या बैठकीत सर्व सहभागी घटकांनी दिलेल्या सूचना आणि उपाययोजना इकोटुरिझम धोरण अधिक प्रभावी आणि वास्तववादी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरल्या. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून लवकरच काही प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यातून जळगाव जिल्हा ‘हरित पर्यटन’ क्षेत्रात एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In