भारतातील शाकंभरी देवीच्या सहा प्राचीन मंदिरांपैकी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

देवांग कोष्टी समाजाची कुलस्वामिनी
सकाळी लवकरच आम्ही साताऱ्याहून निघालो. मुंबई बंगलोर महामार्गावरून पुण्याकडे जात असतांना अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर नागेवाडी गाव लागते. इथे महामार्ग सोडून डाव्या हाताला वळून श्री शाकंभरी देवीच्या मंदिराकडे जाता येते.
हे ठिकाण गावाच्या थोडे बाहेर असल्याने परिसरात वर्दळ कमी असते. छोटी वस्ती पार करून थोडे पुढे गेल्यावर लांबूनच आपल्याला मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. मंदिर परिसर निसर्गरम्य असून चारही बाजूने उसाच्या शेतीने वेढलेला आहे.
पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. मोठे सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात चांदीच्या प्रभावळीत काळ्या पाषाणातील शाकंभरी मातेची अष्टभुजा मूर्ती स्थित आहे. सिंहावर आरूढ असलेल्या देवीच्या सात हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत . मातेच्या मूर्तीसमोरच एक शिवपिंडी दिसून येते. ही देवी देवांग कोष्टी समाजाची कुलस्वामिनी असून नवसाला पावते अशी श्रद्धा असल्याने वर्षभर भाविकांची गर्दी येथे दर्शनासाठी होत असते.
मुख्य मंदिरासमोर एक अतिशय सुंदर पाय विहीर असून पायऱ्यांवरून विहिरीत उतरता येते. देवीच्या नित्यपूजा आणि अभिषेकासाठी या विहिरीतले पाणी वापरण्यात येते. श्री देवी शाकंभरी मंदिरासमोर श्री चौंडेश्वरी देवी, श्री गणपती आणि श्री मारीआई देवीची लहान मंदिर आहेत. नागेवाडी गावापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंब गावात पुरातन कोटेश्वर मंदिर आणि बारा मोटांची विहीर ही ठिकाणे ही बघण्यासारखी आहे.
निवास भोजन व्यवस्था –
शाकंभरी मंदिराचे पुजारी श्री. दिलीप खाशाबा सावंत (Mob – 7387379152) यांच्याशी संपर्क साधल्यास नागेवाडी येथे निवास भोजनाची घरगुती सोय होऊ शकते. सातारा शहर येथून जवळच असल्याने येथे निवास भोजनाचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन




