Thursday, July 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट"द्वारे इतिहास, श्रद्धा आणि शौर्याचा संगम

वनमंत्र्यांच्या हस्ते वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे उद्घाटन

जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता – डॉ.नितीन विसपुते

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | “भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले.

व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते असे ही ते म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क, बांभोरी आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत डॉ .विसपुते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात ते म्हणाले की, “देवाने माणसाचे जीवन सोपे केले, पण माणसानेच ते व्यसनांच्या आहारी जाऊन कठीण, गुंतागुंतीचे बनवले आहे,” असे सांगत, व्यसनामुळे होणाऱ्या नुकसानांचे स्पष्ट चित्र उपस्थितांपुढे मांडले. व्यसनामुळे तोंड व शरीरास दुर्गंध येतो, प्रतिकारशक्ती घटते, आनंददायक संप्रेरकांची निर्मिती कमी होते आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ढासळते, असे त्यांनी नमूद केले.

व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, ध्यानधारणा करणे, कुटुंबीयांशी संवाद वाढवणे आणि सजगता विकसित करणे हे उपाय सुचवले.

विसपुते यांनी गौतम बुद्धांचा अंतिम संदेश “मोह, माया सोडा आणि सजग रहा” याची आठवण करून दिली. १९१७ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकाचा संदर्भ देत असेही नमूद केले की, व्यसनाधीनतेची स्थिती १०८ वर्षा नंतर आजही बदललेली नाही, ही खेदजनक बाब बोलून दाखविली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक यांनी प्रस्तावना केली. ‘आपला एकही सहकारी व्यसनी नसावा हा विचार कंपनीचे संस्थापक श्रद्धेय (मोठेभाऊ) भवरलालजी जैन यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनच करून त्यावर प्रत्यक्ष कृती केली. आज त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने देखील त्यात सातत्य ठेवले आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने व्यसने सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे…’ असे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

जैन फूड पार्क येथे डॉ. विसपुते यांनी सहकाऱ्यांशी साधला संवाद_*जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन फुड पार्क येथील कांदा निर्जलीकरण प्रकल्पातच्या ट्रेनिंग हॉल येथे सहकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पारख तर प्रमुख पाहुणे म्हणून असलम देशपांडे, डॉ. अरुण चौधरी होते.

सुसंवाद साधताना डॉ. विसपुते म्हणाले की, व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील पत्नी आणि लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात येते, हे त्यांनी अधोरेखित केले. व्यसन केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करत असल्यामुळे त्यातून बाहेर पडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी दोन महत्त्वाचे कानमंत्रही दिले, यात ‘१३८ फॉर्म्युला’ म्हणजे एक तास व्यायाम, तीन वेळा जेवण, आणि आठ तासांची शांत झोप. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की, मानवाला संगीत, सुगंध आणि ध्यानधारणा करणे आवडते. चांगल्या जीवनासाठी या तीन गोष्टींमध्ये आपले मन गुंतवावे असा मोलाचा सल्लाही बोलताना दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पारख यांनी केले तर वक्ते डॉ. विसपुते यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कंपनीच्या गृहपत्रिकेच्या संपादकीय मंडळाचे सदस्य किशोर कुलकर्णी यांनी केले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In