Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे.

देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईल, हा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूया, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

श्री बावनकुळे म्हणाले, या यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे. अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In