
जळगाव | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या निमंत्रितांच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याची निवड चाचणी शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी आठ तीस वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे मैदान विद्या इंग्लिश स्कूल मागे डी मार्ट जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
ज्या मुलींचा जन्म दिनांक १/९/२०१० ते ३१/८/२०१३ दरम्यान झाला आहे ह्याच मुली या निवड चाचणी साठी पात्र असतील. अशा पात्र मुलींनी क्रिकेट च्या पांढऱ्या गणवेशात व क्रिकेट किट सह मैदानावर उपस्थित रहावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव श्री अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे
