Friday, July 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

७वी अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा

महापर्यटन महोत्सवात ६० पंचतारांकित टेन्ट्स, हेलिकॉप्टर राईड , लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव, दि. ३० प्रतिनिधी – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२ वीत क्रिषा राठोड तर दहावीत वेद जयंत भुसकाडे प्रथम आले आहेत.

दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकालात घवघवीत यश संपादित केले. क्रिषा राठोड हा ९५.०० टक्के गुणांसह पहिली आली आहे. तर आरोही रघुनाथ परांजपे ९३.२५ टक्के गुणांसह द्वितीय तर शाल्मली शैलेंद्र अलमन ९२.२५ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यामध्ये ९० टक्यांच्यावर सहा तर ८० ते ९० टक्क्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आयसीएसई (दहावी) मध्ये प्रथम क्रमांकाने वेद जयंत भुसकाडे याला ९६.८० टक्के गुण प्राप्त झाले आहे. त्याला रोबोटिक आणि एआयमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाले. तर दिग्विजय संजय मोरे यांने ९५.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याने इंग्रजी साहित्य विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहे. अनुष्का अशोक महाजन हिला ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. याशिवाय जयेश केडीया या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे. त्याशिवाय ९० टक्क्यांच्यावर नऊ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. परस्परांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, अशोक जैन, अतुल जैन, निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

महत्वाचे
“श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्य जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. या सुयशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! देशाचे उज्जवल भविष्य विद्यार्थ्यांमध्ये असून निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांत आहे.”
श्री. अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In