Friday, July 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

वेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी !

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मौजे चौंडी येथे जागतिक दर्जाचे स्मारक होणार

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार !

मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा हा सांगीतिक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा हा सोहळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेली मूल्ये, तत्वे आणि त्यांचे विचार जगाला मार्गदर्शक असून त्यांची ही मूल्ये व विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्यात येणार असून अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात सुध्दा चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असा संस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार संजय उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, राज पुरोहित, मुख्यमंत्री कार्यालयाचे व संस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह सिने, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले, संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करून संविधानाचा जागर करण्यात येत आहे. राज्यात या निमित्ताने चर्चासत्रे, उद्देशिकेचे वाचन, घरोघरी संविधान यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधान जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी मांडण्याचा सांस्कृतिक विभागाचा संकल्प आहे.

अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रम होत आहे. नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री श्री. शेलार म्हणाले.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In