Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे – वनमंत्री गणेश नाईक

विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, खान्देश सेंट्रल ग्राउंड येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला आहे. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना JITO जळगावच्या वतीने निमंत्रण देण्यात येत आहे.

‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप हा दिवस केवळ जळगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विशेष पर्वणी आहे. या दिवशी सामुदायिक नवकार महामंत्राचा जप आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजणार आहे.

या कार्यक्रमाची महती आणखी वाढवणारी बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी हे देखील ऑनलाइनच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. नवकार महामंत्र शांती आणि सद्भावनेचा दिव्य संदेश दिला जाणार आहे. नवकार महामंत्र, केवळ एक प्रार्थना नाही, तर तो संपूर्ण जगासाठी शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या मंत्राच्या माध्यमातून आपण अनेक आध्यात्मिक विभूतींना वंदन करतो.

नवकार मंत्राचा अर्थ* * णमो अरिहंताणं – अर्थात, ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, त्या अरिहंतांना आमचे नमन. णमो सिद्धाणं – मोक्षपदाला पोहोचलेल्या सिद्धांना आमचा प्रणाम. णमो आयरियाणं – धर्माचे मार्ग दाखवणारे आचार्यांना आमचे वंदन. णमो उवज्जायाणं – आध्यात्मिक गुरुंना आमचा नमस्कार. णमो लोए सव्व साहूणं या जगात असलेल्या सर्व साधू-संतांना आमचे विनम्र अभिवादन. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन JITO जळगावच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या पवित्र कार्यात जिल्ह्यातील सर्व धर्मीय धर्मगुरु, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच सर्व समाजातील, प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. JITO जळगावचे अध्यक्ष सुभाष लोढा, चीफ सेक्रेटरी प्रशांत छाजेड आणि प्रोजेक्ट चेअरमन विनय पारख यांनी जळगाव शहरातील सर्व नागरिकांना या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In