Thursday, October 8, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आठवणी जागवूयात, प्रसिद्ध उद्योगपती मा. अशोकभाऊ जैन यांच्याकडून

एमटीडीसीच्या नवेगावबांध व चांदपूर पर्यटक निवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आठवणी जागवूयात, प्रसिद्ध उद्योगपती मा. अशोकभाऊ जैन यांच्याकडून

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 11, 2025
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

| रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्येत साजरा होतोय ‘प्राण-प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव’ |

| राम मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजीत तीन दिवस विविध कार्यक्रमांदचे आयोजन | देशासह अयोध्या मंदिर परिसर झालाय रमामय |

अयोध्येत रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव साजरा होत असताना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आठवणी जागवूयात, प्रसिद्ध उद्योगपती मा. शोकभाऊ जैन यांच्याकडून जाणून घेऊ सचित्रवर्णन…..

जळगाव | रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन प्राण-प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव भव्य पद्धतीने साजरा केला जात आहे.  ११ जानेवारीपासून सुरू होणारा हा महोत्सव तीन दिवस चालणार असुन १३ जानेवारी रोजी समारोप होणार आहे.

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने उत्सवाचे आयोजन केलं आहे.  रविवारी, मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी तीन दिवसांच्या उत्सवातील विविध कार्यक्रम आणि विधींबद्दल सविस्तर माहिती दिली. प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रम ५ ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. ज्यांना प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित करता आले नाही त्यांना प्राण-प्रतिष्ठा द्वादशी महोत्सवात आमंत्रित केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याची जबाबदारी अखिल भारतीय धार्मिक नेते संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

चंपत राय यांनी सांगितले की, हिंदू कॅलेंडरनुसार, श्री रामललाचा अभिषेक पौष शुक्ल द्वादशी (२२ जानेवारी २०२४) रोजी झाला.  २०२५ मध्ये, जानेवारी महिन्यातील पौष शुक्ल द्वादशी ११ जानेवारी रोजी आहे. अशा परिस्थितीत, हिंदू कॅलेंडरनुसार, ही तारीख ११ जानेवारी येत आहे.

असं जरी असले तरी एक वर्षापूर्वी म्हणजे 22 जानेवारी 2023 या मंगलदिनी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचा  प्राणप्रतिष्ठा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. या कार्यक्रमास जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. अशोकभाऊ जैन हे जळगाव जिल्ह्यातील पन्नास लाख राम भक्तांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, त्यांनी हा सोहळा याची देही याचा डोळा हा सोहळा बघितला, त्याचाच हा अनकट सचित्र व्हिडीओ…. खालील लिंक क्लिक करा…..

आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती !!! अशोक भाऊ जैन… मनुष्य या पृथ्वीतलावावर जन्माला येतो आणि एकदिवस या जगाचा निरोपही घेतो. या निरोपाआधी पूर्ण कालावधीत प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रकारची सुख-दुखं येतात, चांगल्या वाईट घटना- प्रसंगालाही सामोरे जावे लागते. अनेक प्रकारच्या घडामोडीही घडत राहतात. योग्य ते मार्गक्रमण करत पुढे जाणे हेच आपल्या हाती असते. आयुष्याच्या या वाटचालीत अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे आगमन, प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माणनिमित्त अयोध्या येथे जाण्याचे मला भाग्य प्राप्त झालं. ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती आहे.

माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर, ‘leave this world better than you found it’ म्हणजेच ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ आयुष्याच्या प्रत्येक पाऊलावर, प्रत्येक क्षेत्रात माझ्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य, जीवन-लक्ष्य सत्यात उतरविण्याचा आम्ही जैन संयुक्त परिवारातील सदस्य आणि सहकारीही प्रयत्न करीत असतो.

या घटनेमुळे मी निश्चितच सविनय आणि अभिमानेने सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या या ब्रीदवाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला आहे असं मला वाटतं. ‘आपण जन्माला आलो, या पृथ्वीतलावरून जाण्याच्या अगोदर जे काही चांगलं करून जायचं आहे, त्यात अयोध्या येथे उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. या शुभघटनेमुळे माझ्या जन्माचं त्यामुळे सार्थक झाले आहे, अशी माझी भावना आहे.’

Tags: agro tourismashokbhau jainGandhi research foundationGandhi teerthIndia TourismjalgaonmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 7, 2026
Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan

आनंदी निवास, केळशी दापोली

October 1, 2026
गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

October 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In