
शिवाजी महाराजांनी लावलेले वटवृक्ष आज ३०० वर्षांहून अधिक काळापासून इतिहासाची साक्ष देत दिमाखात आहे उभा
सिंधुदुर्ग| मालवणपासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे छत कौलारू आहे. कमरेपर्यंत पिवळ्या रंगात असलेले हे मंदिर भाविकांना विलक्षण शांतीची पत अनुभूती देते. दर तीन वर्षांनी येथे होणारा गावपळणीचा उत्सव विशेष असल्याने हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
या मंदिराबद्दलची कहाणी अशी सांगितली जाते ती अशी आहे, छत्रपती शिवाजी राजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. तेव्हा प्रत्येक भरतीला तळाचे दगड जागा सोडत होते. त्यामुळे किल्ल्याचे बांधकाम आकारच घेत नव्हते. तेव्हा शिवरायांना दृष्टांत घडला अन् स्वयंभू पिंडीचा शोध त्यांनी घेतला. पिंडीवर एका रात्रीत घुमटी उभारली. घुमटी उभारताच किल्ल्याच्या बांधकामाला वेग आला. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मात्र, शिवछत्रपतींनी जी घुमटी बांधली आहे, ती जीर्णोद्धाराच्या वेळी तोडण्यात येऊ नये, असे शासकीय आदेश असल्यामुळे या घुमटी आजही पाहावयास मिळतात.
या ठिकाणी आणखीन एक ऐतिहासिक बाब म्हणजे शिवाजी महाराजांनी याठिकाणी एक वडाचे झाड लावले. आज ३०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी हा वटवृक्ष इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या झाडाला शिवाजी महाराजांचा वड म्हणून ओळखतात. आचरे गावात अनेक देवालये असली तरी श्री देव रामेश्वर हे त्या गावाचे प्रमुख देवस्थान आहे. या श्री देव रामेश्वरास हे संपूर्ण गाव कोल्हापूर संस्थानाने इनाम दिले आहे. म्हणून रामेश्वरास श्री देव रामेश्वर इनामदार असेही म्हणतात.
मंदिर अतिशय भव्य आहे. आचरे गावची गावपळण प्रसिद्ध आहे. एकदा रामेश्वर मंदिरातून गाव सोडण्याची नौबत झाली की या बारा वाड्यांतील गावकरी गाव सोडतात. तीन दिवसांनंतर रामेश्वराने परतीचा कौल दिल्यानंतर गाव पुन्हा भरतो. श्रावणात एकदा भेट द्यावी असे हे मंदिर आहे.
कसे जाल मालवणहून फक्त १० किलोमीटरचा प्रवास रामेश्वर गाठण्यासाठी करावा लागतो. रस्तेमार्गाने जाणेच श्रेयस्कर आहे.
