Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शाश्वत ‘धाम’ हेच लक्ष्य ठेवा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

शाश्वत ‘धाम’ हेच लक्ष्य ठेवा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 13, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘चक्रवर्ती’ पेक्षा आपण मोठे हा अहं भाव निर्माण होत आहे….. परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

एखादी व्यक्ती मनाप्रमाणे मोक्षप्राप्तीच्या लक्ष्याकडे जात असताना शंका, किंतु-परंतु ज्या मनुष्यात असते ते अर्ध्या रस्त्यामध्ये थांबून जातात. त्यालाच आपले घर मानतात. आपल्या सामर्थ्याला, बुद्धिला, पैसा, पद, प्रतिष्ठेला, संसाराला ‘शाश्वत’ घर मानतात. सामाजिक मापदंड सोडून फक्त ‘धन’ यावर आधारित निर्णय घेत असतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग संशयशील बनवतात. यातूनच अहंकार, अहंम भाव वाढतो आहे. गृहप्रवेशच्या नावाखाली गृहप्रदर्शन होत असून वास्तविक ती अहं आणि प्रशंसाची भूक आहे. आधी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा होत्या मात्र आता आधी लाडी, वाडी, गाडी या तीन मुलभूत गरजा काळानुरुप होत आहेत. त्यातही आधी गाडी, वाडी आणि त्यानंतर लाडी ही सामाजिक विचारधारा समाजामध्ये वाढत आहे. ह्यावर चिंतन झाले पाहिजे.

‘चक्रवर्ती’ पेक्षा आपण मोठे हा अहं भाव निर्माण होत आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा असताना ती कुठे आणि कशासाठी वापरतोय हे लक्षात घेतले पाहिजे. आयुष्याची जमापूंजी गोळा करुन निर्माण केलेले घर, बंगला टिकणारा नाही, जे घर, बंगला निर्माण करणारे आहेत ते सुद्धा त्यात कायम राहणार नाहीत. त्यात कायम राहणारेसुद्धा टिकणार नाहीत. आपल्यातील आत्माला जाण्यासाठी मेन गेट ची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे मुलभूत गरजांच्या गरजेपुरताच वापर करुन शाश्वत परमार्थ शोधा, शाश्वत धाम शोधा! त्यासाठी नमी राजाचे प्रेरणादायी उदाहरण शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकां समोर दिले.

मनुष्य हा यशस्वीता आणि अयशस्वीता यावर मापदंड ठरवित असतो. मात्र प्रत्यक्षात आत्मविश्वास आणि दृढनिश्चय, साहस, पुरुषार्थ यावर मापदंड ठरले पाहिजे. आत्मविश्वास मजबूत असेल तर शिखर गाठता येते आणि आत्मविश्वास कमी असेल तर छोट्यातील छोटे काम सुद्धा पहाडासारखे कठिण लागू लागते. आपल्यातील अनंत शक्ती जागृत करुन आत्मचैतन्याची अनुभूती घेतली पाहिजे. आत्मज्योत जागृत झाल्यावर कुठलेही कार्य हे सफल झाल्याशिवाय राहत नाही. यातून विधायक कार्याचे साहस प्राप्त होते आणि आपल्या हातून पुरुषार्थ घडतो. असे विचार प्रवचनाच्या आरंभी प.पू.श्री भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले….. स्वाध्याय भवन, जळगाव _शब्दांकन – देवेंद्र पाटील, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव

Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJain Hillskokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMahavir
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In