Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
एमटीडीसीच्या विविध विभागांमध्ये तरुणांना आपले कलाकौशल्य दाखवण्याची संधी

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा यापुढे दरवर्षी साजरा होणार

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

एमटीडीसीच्या विविध विभागांमध्ये तरुणांना आपले कलाकौशल्य दाखवण्याची संधी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 29, 2024
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘एमटीडीसी’त फेलोशिपचा कार्यकाल पूर्ण केलेल्या युवकांचे पर्यटन विकास महामंडळाच्या सचिव जयश्री भोज, व्यवस्थापकीय संचालक तथा पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी शुभेच्छा देत केले कौतुक

मुंबई | राज्याच्या पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी फेलोशिपची संधी उपलब्ध करून दिली होती. त्याचा फेलोशिप कालावधी आज पूर्ण झाला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विविध क्षेत्रातून निवड केलेल्या अभ्यासपूर्ती (फेलोशिप) करणाऱ्या युवांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या सचिव जयश्री भोज, व्यवस्थापकीय संचालक तथा पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन विभागाचे सहसचिव श्री. रोकडे उपस्थित होते.

महामंडळामार्फत विविध क्षेत्रातून निवड केलेल्या 10 फेलोंनी यामध्ये विशेष योगदान दिले. यामध्ये समृद्धी बोरगे, अनिकेत घोरपडे, पराग मगर, श्रृती नेवे, समर्थ खोत, निहारिका शर्मा, पूर्वी मेस्त्री, यामिनी महामुणकर, सिध्देश चव्हाण आणि सागरिका दोडके या विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या पर्यटक निवासांची कायापालट करण्यासाठी विविध घटकांसोबत काम केले.

पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. गेले वर्षभर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये कार्यरत असलेले दहा युवकांनी पर्यटन क्षेत्रातील विकास म्हणजेच पर्यटक निवास, उपहारगृह, जलपर्यटन, अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन परिषदा, प्रदर्शन, जनसंपर्क यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमध्ये तरुणांना आपले कलाकौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त झाली. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

Tags: agro tourismDirectorates of Tourism MaharashtraDirectoret of TourismDOTIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmtdcMtdc resorts
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In