Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

मृदगंध : कोकणातले नदी किनारी असलेले फार्महाऊस

किनारा सुरक्षिततेसाठी राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका

विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे प्रदर्शन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 25, 2023
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक l निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

नवी दिल्ली l ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री. सिंग यांनी येथे मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

दिवाळी हा भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा होता. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात.

महाराष्ट्रात १९०९ पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची सुरु झाली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही श्री. सिंग यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन येथील वाचकांसाठी पर्वणी असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.

प्रदर्शनात १२० दिवाळी अंकांची मेजवानी या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून साऱ्याजणी, चारचौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दीपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी, धनंजय, साधना, सामना, अक्षरधारा, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, आदी दिवाळी अंक मांडण्यात आले होते.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In