Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मृदगंध : कोकणातले नदी किनारी असलेले फार्महाऊस

जैन हिल्स येथील हायटेक शेतीचा नवा हुंकारमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिना निमित्त प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव

विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे प्रदर्शन

मृदगंध : कोकणातले नदी किनारी असलेले फार्महाऊस

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 25, 2023
407 4
0
566
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Dr. Dabhadkars Farm House – मृदगंध फार्महाऊस : नाते गाव, महाड रायगड महामार्ग, महाड

मृद्गंध – हा व्हीडिओ जरूर बघा

महाड – महाराष्ट्राच्या कोकण (#Kokan) विभागात असलेल्या रायगड (#Raigad) जिल्ह्यातील एक निसर्गरम्य शहर म्हणजे महाड (#Mahad). मुंबईपासून १६४ किलोमीटर अंतर आणि पुण्याहून १२८ किलोमीटर अंतरावर (Google map नुसार) असलेले महाड या शहराला सह्याद्री पर्वत रांगांची किनार लाभली आहे. कोकण रेल्वेने आल्यास वीर स्टेशन येथे उतरून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या #महाड येथे जाता येते.

मुंबई गोवा महामार्गावर असलेले महाड हे एक टुमदार शहर. सावित्री नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. महाडचे ग्रामदैवत असलेले श्रीदेव #विरेश्वर महाराज यांचे अतिशय पुरातन हेमाडपंथी मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तळ्याकाठी स्थित आहे. जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी आहे. मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला येथून जवळच आहे. डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर यांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावरप्रसिद्धी पावलेले ऐतिहासिक #चवदारतळे ही याच गावात आहे. मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला येथून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे.

कोकण म्हटलं की नजरेसमोर नारळीपोफळी, आंबा, काजूची झाडे, उंचच उंच हिरवेगार डोंगर, घाटमाथे, नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या नद्या आणि अथांग दर्या सागर असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. कोकणातल्या नयनरम्य वातावरणामुळे राज्याच्या विविध भागातील असंख्य पर्यटक आकर्षित होऊन कोकणात दाखल होत असतात.

मृद्गगंध फार्म हाऊस पासुन अंदाजे 70 km अंतरावर समुद्रकिनारी असलेले हे मंदिर

महाड शहराच्या ८० किलोमीटर परिघात अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांनी महाड येथे दोन तीन दिवस मुक्काम केल्यास पुरातन देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे, किल्ले, आकर्षक आणि सुरक्षित समुद्रकिनारे बघता येतील. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम दृश्य आपल्या मोबाईल मध्ये साठवून ठेवावे असेच आहे.

मृद्गगंध फार्म हाऊस पासुन चिपळूण जवळ, अंदाजे 70 km अंतरावर असलेले हे पुरातन मंदिर

किल्ले रायगडापासून १५ किलोमीटर अस्तरावर असलेले Dr.Dabhadkars – मृदगंध व्हिला -रायगड जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे किल्ले रायगड. असंख्य शिवप्रेमींचे श्रद्धास्थान. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याची खरी शक्ती तुम्हाला अनुभवायची असेल, तर रायगड किल्ला तुम्हाला साद घालतोय असं समजा. बाराशे एकर परिसरात वसलेला हा संपूर्ण किल्ला बघावयाचा झाल्यास तुम्हाला येथे दोन/तीन दिवस मुक्काम करावा लागेल. किल्ल्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेले, Dr.Dabhadkars – मृदगंध व्हिलामध्ये आरामशीर निवास आणि चविष्ट भोजन व्यवस्थेसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

निसर्गरम्य वातावरण लाभलेले – मृदगंध व्हिलामहाड-किल्ले रायगड मार्गावर महाड पासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर Dr.Dabhadkars – मृदगंध व्हिला आहे. या मार्गावर नाते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळावे लागते. निसर्गरम्य परिसर, लाला मातीच्या वळणांच्या रस्त्याने नदीवरील छोटासा पूल ओलांडून उजविकडे वळावे लागते. काही अंतर पुढे गेल्यावर डाव्या हाताला मृदगंध व्हिलाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेश द्वारा समोरच बारमाही वाहणारी छोटीशी नदी आहे. हौशी पर्यटक या नदीत गळ टाकून मासेमारीचा आनंद घेऊ शकतात. अगदी नदीकाठीच हि प्रॉपर्टी असल्याने उन्हाळ्यात हि हवेत गारवा असतो. आत प्रवेश केल्यावर पारंपरिक कोकणी पद्धतीने जांभ्या दगडात बांधलेल्या कौलारू बंगल्याचे आवारात आपण येतो. आजूबाजूला भात शेती, विस्तीर्ण लॉन, आंबा, फणस, काजू, नारळ, केळी, विविधरंगी फुल झाडे, चिक्कूच्या झाडांची लागवड केलेली आहे. वर्षभर सुवासिक फुले देणारी सोन चाफ्याची बहरलेली झाडे, विविध प्रकार आणि रंगांची फुलझाडे बघून मन प्रसन्न होते. विविध प्रकारचे पक्षी हि येथे बघायला मिळतात. हिरवाईने पांघरलेला इथला निसर्ग पर्यटकांचं मन मोहित करणारा असाच आहे.

Dr.Dabhadkars – मृदगंध व्हिला – शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून दूर, एकांतात, निसर्गरम्य वातावरण लाभलेले, कोकणी संस्कृती आणि जीवनशैली जपणारे मृदगंध व्हिला पर्यटकांसाठी एक प्रकारे स्वर्गसुखाचा अनुभव देणारे असेच आहे. या व्हिला मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. दोन AC बेडरूम, प्रशस्त हॉल, सेल्फ कन्टेन्ट किचन, पार्किंग व्यवस्था असे मृदगंध व्हिलाचे स्वरूप आहे. बेडरुममध्ये वेस्टर्न स्टाईलचे अटॅचड वॉश रूम आहे. व्हिलाच्या समोर असलेल्या मोठ्या ओसरीत सीट आऊटसह डायनिंग एरिया आहे. बंगल्याच्या डाव्या बाजूस पन्नास शंभर लोकांचे गेट टुगेदर होऊ शकेल एव्हडे मोठे वेलमेनटेन्ड हिरवेगार लॉन आहे. पर्यटकांच्या मागणीवरून या लॉनवर छोट्या पार्टीसाठी स्वतंत्र टेबल व्यवस्था करण्यात येते. छोटी बैठक व्यवस्था असलेले गॅझेबो हि येथे आहे.

मृदगंध व्हिला – न्याहारी / भोजन व्यवस्था –*कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. शिवभक्त आणि हौशी पर्यटकांसाठी कोकणातील पारंपरिक भोजनाचा आनंद घेण्याची उत्तम व्यवस्था मृदगंध व्हिलामध्ये होऊ शकते. ओले खोबरे, आमसूलचा वापर करत पारंपरिक मसल्यामध्ये तयार करण्यात येणाऱ्या सीफूड राईस प्लेट, पॉपलेट, सुरमई, कोळंबी फ्राय / करी, चिकनच्या डिशेस पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेतच. त्याचबरोबर कोकणी व्हेज पदार्थांमध्ये व्हेज थाळी, डाळिंब्यांची उसळ, उकडीचे मोदक, आंबोळी, पानग्या, कुळीथ पिठले, ओल्या काजूची भाजी, फणसाची भाजी, सोलकढी, तांदळाची भाकरी यासह अनेक प्रकारच्या डिशेस ऑर्डर प्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातात.

मृदगंध व्हिला – निसर्गरम्य परिसर / हंगामात लुकलुकणार्या काजव्यांनी प्रकाशमय होतो परिसर – बंगल्याच्या डाव्याबाजूस समोर क्षितिजाकडे बघितल्यास संह्याद्री पर्वत रंगावर तरंगणारे पांढरे शुभ्र ढग असे मनमोहक दृश्य येथे तुम्हास बघता येते. वळवाच्या पावसाचे वेध लागल्यावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजवांच्या प्रजन काळ सुरू होतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी स्वयं प्रकाश निर्मिती करत लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे, असे चित्र मृदगंध व्हिलाच्या परिसरात बघायला मिळते आहे.

मृदगंध व्हिलामध्ये दोन तीन दिवस मुक्काम केल्यास आजूबाजूला बघता येण्यासारखी पर्यटन स्थळे – किल्ले रायगड – मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला मृदगंध व्हिला पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. पायी मार्गाने किव्हा रोप-वे द्वारे आपण रायगडावर पोहचू शकतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाल, महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो राज दरबार, राणी महाल, अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे, जगदीश्वर मंदिर, महाराजांचे समाधी स्थान आपण बघू शकतो.

शिवथरघळ – महाडपासून ३०किमीवर असलेले शिवथरघळ निसर्गरम्य ठिकाण आहे. रामदास स्वामींनी आपल्या निवासासाठी निवडलेली वृक्ष वेलींनी वेढलेली अरण्यातली हि एक प्रशस्त गुहा आहे. संसारात रमलेल्या सामान्य जनतेला सोप्या भाषेत अध्यात्माचे सार सांगणाऱ्या ‘दासबोध’ या ग्रंथाची रचनाही स्वामींनी याच ठिकाणी केली. गुहेच्या उजव्या बाजूस अंदाजे शंभर फूट उंचीवरुन कोसळणारा प्रचंड मोठा धबधबा आहे.

या व्यतिरिक्त प्रतापगड किल्ला, गंधार पाले लेणी हि ठिकाणे हि मृदगंध व्हिला पासून जवळच आहेत. दोन तासाच्या अंतरावर असलेल्या हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर येथील समुद्र किनाऱ्यांना आपण भेटी देऊ शकतो. अस्सल ग्रामीण कोकण अनुभवायचे असेल तर एकदा Dr.Dabhadkars – मृदगंध फार्महाऊसला अवश्य भेट द्या. येवा कोकण आपलाच असा…..

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahadmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRaigadछत्रपती शिवाजी महाराजशिवथरघळ
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In