Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जी-२० परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग होणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम

जी-२० परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 24, 2023
399 5
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा भव्य असा लाईट ॲन्ड साउंड शो सादर

मुंबई l जी -२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी सदस्यांनी ढोल ताशे आणि लेझीमच्या संगीतावर ताल धरत आनंद घेतला. गेट वे ऑफ इंडिया येथे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध देशातील मान्यवर प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार उपस्थित होत्या.

जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.

या प्रतिनिधींसाठी काल सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

कठपुतली, लाईव्ह पेंटींग यासह राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा भव्य असा लाईट ॲन्ड साउंड शो सादर करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वातंत्र्य चळवळीतील राज्याचे योगदान आणि आतापर्यंत झालेला राज्याचा देदिप्यमान प्रवास असे विविध टप्पे असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित प्रतिनिधींनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली.हा कार्यक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि केंद्राच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर केला गेला.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In