अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत
पुणे l सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते. ‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असता सुरुवातीला त्यांच्या हस्ते, विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपण प्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.
अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत – विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणाऱ्यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या माणसांशी जोडणारा भावनिक सोहळा आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून दरवर्षी हजारो चाकरमानी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या कोकणातील गावी परततात.यंदाच्या गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ५,२२० जादा बसगाड्या सोडण्याचा मेगाप्लॅन आखला आहे. ही… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने २९ जुलैपासून ‘मार्ग क्र. ९ए (Route 9A)’ या नव्या पर्यटन बस सेवेची सुरुवात केली आहे. अवघ्या ₹५०० प्रति प्रवासी या माफक शुल्कात मुळशी परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची एकदिवसीय सफर करता येणार आहे. मान्सून पर्यटनाला मिळणार नवी दिशा – पावसाळा सुरू होताच… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री राम”च्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना